फसवणूकीचा विक्रम करणाऱ्यांना आता टक्केवारी घेण्यासाठी आमदार व्हायचंय!राहुल जगताप यांची घणाघाती टीका..


प्रशासक न्यूज,दि.१५ नोव्हेंबर २०२४

भाजपने आर्थिक फसवणूकी शी संबंधित ३० गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे हा एक प्रकारे त्यांनी विक्रमच केला असून आता त्यांना कारवाईला संरक्षण आणि विकास कामात टक्केवारी घेण्याची लागलेली सवय अखंड राहावी म्हणून आमदार व्हायचे असल्याची टीका अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांनी वाळकी येथील सभेत बोलताना केली.

वाळकी येथे प्रचार सभे प्रसंगी जगताप बोलत होते.
अध्यक्षस्थानी संभाजी कासार होते.

जगताप म्हणाले भाजप उमेदवाराने गेल्या अडीच वर्षात टक्केवारी घेतल्याने कामाचा दर्जा घसरला काही कामे तर शुभारंभ करून बंद पडली त्यामागे देखील टक्केवारी हेच कारण आहे .महाविकास आघाडी उमेदवारावर टीका करताना जगताप म्हणाले त्यांनी माझी उमेदवारी डावलण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी झाला पण मला तुम्ही जनतेने आग्रह करून उमेदवारी करण्यास बळ दिले.

यावेळी जगताप यांनी विरोधी उमेदवारांवर टीका करत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदार संघ माहित नाही असे सांगून महाविकास आघाडी आणि भाजप हे दोन्ही उमेदवार पुण्याला राहतात यांना मतदार संघाचे देणे घेणे नाही माझ्यावर भाजप चा डमी उमेदवार असल्याची तसेच ३० कोटीचा आरोप होतो पण मी लोकसभा निवडणूकीपुर्वी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मला कारखान्यासाठी १३८ कोटी रुपये देत होते मी तिकडे गेलो नाही त्यामुळे माझ्यावरील आरोप निराधार आहे खासदार शरद पवार यांच्या वर निष्ठा ठेवली मला उमेदवारी मिळाली नाही पण शरद पवारांच्या आशीर्वादाने निवडणूक लढवत असून शरद पवार यांचे सर्व उमेदवार तुतारी चिन्हावर तर मी एकमेव रोडरोलर चिन्हावर निवडणूक लढवत आहे.

यावेळी, स्मितल वाबळे, संभाजी कासार,निमसे,पाटील,अतुल लोखंडे टिळक भोस,अनिल ठवाळ , हरिदास शिर्के श्याम जरे प्रकाश पोटे राजेंद्र परकाळे राजेंद्र म्हस्के आदींची भाषणे झाली.

माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे,स्मितल भैय्या वाबळे, माजी सरपंच दानिश सय्यद,पांडुरंग पोटे, सकलेन शेख,नितीन डुबल,बाळासाहेब उगले आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रारंभी फुलांचा वर्षाव करून राहुल जगताप यांचे स्वागत करण्यात आले.
फसवणूकीचा विक्रम करणाऱ्यांना आता टक्केवारी घेण्यासाठी आमदार व्हायचंय!राहुल जगताप यांची घणाघाती टीका.. फसवणूकीचा विक्रम करणाऱ्यांना आता टक्केवारी घेण्यासाठी आमदार व्हायचंय!राहुल जगताप यांची घणाघाती टीका.. Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १५, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.