समझोत्याचे राजकारण करणारे बाजूला ठेवून शेतकऱ्याची लेक म्हणून मला मतदान करा/सौ सुवर्णा पाचपुते


प्रशासक न्यूज,दि.१५ नोव्हेंबर २०२४

(श्रीगोंदा):गाव संवाद दौरा करत असताना मांडवगण येथे कॉर्नर बैठकीमध्ये बोलताना अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते म्हणाल्या प्रस्थापित सत्ताधारी व कारखानदार हे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी एकमेकांविरोधात समझोता करून साधे उमेदवार देतात व तेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. आता हा डाव लोकांनी ओळखला आहे त्यामुळे येत्या २० तारखेला सामान्य शेतकऱ्याची मुलगी म्हणून मला मतदान करा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

निवडणुकीची रंगत वाढत असताना आरोप प्रत्यारोप होत आहेत परंतु श्रीगोंदा - नगर विधानसभेच्या अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांच्या बाबतीत सहानुभूतीची सुप्त लाट तयार झाली आहे अशी लोकांमधून चर्चा आहे. गाव संवाद करत असताना जनतेकडून बदलाची अपेक्षा होत आहे. ४० वर्षामध्ये तालुक्याचा कसलाच विकास झाला नाही. तेच तेच सत्ताधारी आलटून पलटून सत्ता उपभोगत आहेत तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्या मी तालुक्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाईल असं यावेळी त्यांनी सांगितले.
समझोत्याचे राजकारण करणारे बाजूला ठेवून शेतकऱ्याची लेक म्हणून मला मतदान करा/सौ सुवर्णा पाचपुते समझोत्याचे राजकारण करणारे बाजूला ठेवून शेतकऱ्याची लेक म्हणून मला मतदान करा/सौ सुवर्णा पाचपुते Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १४, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.