अनुराधा नागवडे विधिमंडळात आल्यावरच त्यांच्याकडून निवेदन स्वीकारतो!उद्धव ठाकरे यांच्या श्रीगोंद्यातील सभेला उस्फुर्त प्रतिसाद!
प्रशासक न्यूज,दि.१४ नोव्हेंबर २०२४
श्रीगोंदा तालुक्याच्या दृष्टीने डिंभे माणिकडोह बोगदा,साकळाई योजना यासह अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबीत आहेत त्याचे निवेदन मला अनुराधा नागवडे या देत आहेत पण आतां त्यां आमदार म्हणून विधीमंडळात आल्यावरच मी त्यांच्याकडून या मागण्यांचे निवेदन स्वीकारणार आणि हे सर्व प्रश्न सोडवणार असे सांगून तुमचा सर्वांचा प्रतिसाद पाहुन अनुराधा नागवडे या नक्की आमदार होतील असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला
महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना(ऊ.बा.ठा)गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज श्रीगोंद्यात आले होते यावेळी काँग्रेसच नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात,राष्ट्रवादीच्या(शरद पवार गट)खासदार फौजीया खान,ओबीसी अध्यक्ष राज राजापूरकर,शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे सर, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, दीपक शेठ नागवडे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ,संपत म्हस्के, जेष्ठ नेते बाबासाहेब भोस,घनश्याम शेलार,अनिल वीर,शिवसेनेचे बाळासाहेब दुतारे,तालुकाध्यक्ष विजय शेंडे,काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर,संतोष इथापे, संतोष खेतमाळीस,अरविंद कापसे नगरसेवक प्रशांत गोरे, संतोष कोथिंबीरे,सतीश मखरे,निसार बेपारी,एमडी शिंदे,माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे, यांच्यासह श्रीगोंदा व नगर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेसाठी श्रीगोंदा नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती
यावेळी बोलताना ठाकरे यांनी साजन पाचपुते यांनी मनाचा मोठेपणा दाखवत अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यास सांगितले त्याचे कौतुक करत साजन यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे देखील आवर्जून सांगितले तसेच घनश्याम शेलार यांनी माघार घेतल्यामुळे त्यांचे देखील धन्यवाद मानले यावेळी बोलताना ठाकरे यांनी त्यांच्या ठाकरे शैलीत विरोधकांचा समाचार घेताना आता काही लोक टीव्ही वर दिसण्यासाठी स्वतःच्या बॅग आता तपासून घेत असल्याचा टोमणा त्यांनी विरोधकांना लगावला अमित शहा हे सहकार मोडीत काढत असून सहकारी कारखाने त्यांना अदानीच्या घशात घालायचे आहेत असा आरोप करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,अमित शहा यांच्यावर विविध मुद्द्यावरून जोरदार टीका केली एअर क्लीरन्स ला परवानगी मिळत नसल्याने ठाकरे यांना सभास्थळी येण्यास उशीर झाला त्यावरून ठाकरे यांनी मला त्रास देण्यासाठी माझी बॅग तपासणे परवानगी नाकारणे हे मुद्दाम केल जात असल्याचे सांगितले
उपस्थित शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याचे सांगताच काश्मीर मधील कलम ३७०हटवलं ना एवढंच उत्तर अमित शहा देत आहेत पण त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असे सांगून त्यांनी अमित शहा यांना टोला लगावला तसेच १५००रुपये महिलांना देऊन हे मिंधे सरकार महिलांना नोकर समजायला लागलंय असे सांगत महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सुरत,नागपूर सह प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले
*निलेश लंकेना ठाकरेंच आवाहन* खानिलेश लंके हे मूळचे शिवसैनिकच महाविकास आघाडीकडून उमेदवारी करत ते लोकसभेला निवडून आले आता त्यांनी आघाडी धर्म पाळत श्रीगोंद्यात येऊन अनुराधा नागवडे यांचा प्रचार करावा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी लंके यांना केले
*अपक्ष उमेदवार गद्दारीच करतायेत*
मिंधे सरकारने ५०खोके घेऊन महाविकास आघाडीशी गद्दारी केली तशीच गद्दारी श्रीगोंद्यात महाविकास आघाडीतून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करणारे उमेदवार गद्दारीच करत असल्याचा टीका ठाकरे यांनी नाव न घेता राहुल जगताप यांच्यावर केली
आज या सभेत बोलताना महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी परखड शब्दात आपले मत मांडताना स्व बापूंनी तालुक्याला स्वतःच्या कुटुंबा सारखं जपलं इतरांना मदत करण्याची दानत फक्त नागवडे कुटुंबातच असल्याचे सांगत आज घनश्याम शेलार आमच्या सोबत आले त्यांचा आम्ही सन्मान करतो तसाच सन्मान अपक्ष उमेदवारांचा सुद्धा केला असता पण त्यांच्यात मनाचा मोठेपणा दाखवण्याची दानत नाही असे सांगत नागवडे यांनी नाव न घेता राहुल जगताप यांच्यावर तोफ डागली.
*राजा व्यापारी म्हणून प्रजा भिकारी पाचपुतेना टोला*
श्रीगोंद्यातील प्रशासकीय कार्यलयांची दुरावस्था पोलीस वसाहतीची दुरावस्था यावरून अनुराधा नागवडे यांनी आ बबनराव पाचपुते यांच्यावर टीका करत ज्या राज्याचा राजा व्यापारी असतो तिथली प्रजा भिकारी असते असे सांगितले तसेच ज्यांनी कधी साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही ते विधानसभा लढायला निघालेत असे सांगत त्यांनी नाव न घेता भाजप उमेदवार विक्रम पाचपुते यांच्यावर टीका केली
*एक भाजपचे अधिकृत तर एक अनधिकृत उमेदवार*
श्रीगोंद्यात समोर एक भाजपचे अधिकृत तर दुसरे भाजपचे अनधिकृत उमेदवार असून दोघे मिळून तालुक्याची वाट लावायला निघालेत असे सांगत त्यांनी स्व बापुना श्रद्धांजली म्हणून आपल्याला मत देण्याचे आवाहन उपस्थिताना केले
यावेळी बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की मला असं समजलं की समोरच्या उमेदवारला अनुभव नाही पण त्या उमेदवारावर ३०केसेस असून त्यांना किती दांडगा अनुभव आहे असे सांगत थोरात यांनी विक्रम पाचपुते यांचे नाव न घेता त्यांना चांगलाच टोला लगावला तसेच स्व शिवाजी बापूंच्या संमतीमुळेच कुकडी कारखान्याची निर्मिती झाल्याचे सांगत अजूनही अपक्ष उमेदवाराने माघार घेत नागवडे यांना पाठींबा द्यावा असे आवाहन थोरात यांनी नाव न घेता राहुल जगताप यांना केले
तसेच घनश्याम शेलार यांना सरकार आल्यावर चांगला न्याय देऊ असे देखील आश्वासन थोरात यांनी यावेळी दिले
प्रस्ताविक करताना जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्यावर कडक शब्दात टीका केली जगताप हे शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याचे सांगून गैरसमज पसरवत आहेत २०१९ साली त्यांना उमेदवारी भेटत असून सुद्धा ते का पळून गेले असा सवाल विचारत जगताप यांनी आधी शेतकऱ्यांचे पैसे द्यायला हवे होते असे सांगून ते भाजपचे डमी उमेदवार असल्याची टीका यावेळी केली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजीया खान यांनी श्रीगोंद्यात शरद पवार यांचा फोटो वापरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु असून त्याला न भुलता नागवडे याच उमेदवार असल्याचे स्पष्ट केले
अनुराधा नागवडे या दुर्गा शक्तीच्या अवतार असून त्यां विधानसभेत गेल्या पाहिजेत असे बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला सांगितल्यामुळे आपण थांबल्याचे घनश्याम शेलार यांनी सांगितले
यावेळी शिवव्याख्याते सुभान अली, ओबीसी अध्यक्ष राज राजापूरकर,सुनंदा पाचपुते,शरद पवार,मुकुंद सोनटक्के यांची भाषणे झाली आभार साजन पाचपुते यांनी मानले
अनुराधा नागवडे विधिमंडळात आल्यावरच त्यांच्याकडून निवेदन स्वीकारतो!उद्धव ठाकरे यांच्या श्रीगोंद्यातील सभेला उस्फुर्त प्रतिसाद!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १४, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: