प्रशासक न्यूज,दि.१४ नोव्हेंबर २०२४
श्रीगोंद्यात भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सौ सुवर्णा पाचपुते यांनी सोबत कोणताही मोठा नसताना फक्त सामान्य जनता केंद्रस्थानी मानून होम टू होम प्रचारावर भर देत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे श्रीगोंदा व नगर तालुक्यातील सर्व गावातील वाड्या वस्त्यांवर जाऊन सुवर्णा पाचपुते या मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत
या होम टू होम प्रचाराला त्यांना चांगला प्रतिसाद लाभत असून आम्ही मातब्बर आणि प्रस्थापित नेत्यांना डावलून आता यावेळी सुवर्णा पाचपुते यांना मतदान करणार असल्याच्या भावना तरुण तरुणी महिला यांच्यासह वयोवृद्ध लोक व्यक्त करत आहेत
*सुख दुःखात सहभागी होणाऱ्या हक्काच्या उमेदवार म्हणून सुवर्णा पाचपुते यांना पसंती*
सुवर्णा पाचपुते यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून सामान्य लोकांच्या सुख दुःखात सहभागी होत आपला जनसंपर्क वाढवला त्यामुळे फक्त निवडणुकी पुरत्या त्या सक्रिय नसून त्या कायम लोकांच्यात मिसळून काम करणाऱ्या महिला नेत्या म्हणून लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असून मी आमदार झाल्यावर सर्वसामान्य व्यक्ती आमदार होणार असून आपल्या घरातील हक्काच्या उमेदवार म्हणून लोक आपल्याकडे बघत असल्याची प्रतिक्रिया सुवर्णा पाचपुते यांनी दिली आहे
अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांची होम टू होम प्रचारात आघाडी!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १४, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: