प्रशासक न्यूज,दि.१४ नोव्हेंबर २०२४
श्रीगोंदा तालुक्यातील जनता पाण्यासाठी झगडत असताना कुकडी पाणी प्रश्न ,रस्ते ,वीज ,पाणी, आरोग्य, शिक्षण या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अण्णासाहेब शेलार यांची उमेदवारी असून आजपर्यंत प्रस्थापितांनी भूलथापा मारल्या. परंतु जनतेची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी अण्णासाहेब शेलार हे जनतेच्या प्रश्नाला बांधील आहेत. त्यामुळे तीस हजाराच्या मताधिक्याने अण्णासाहेब शेलार निवडून येतील असा ठाम विश्वास बेलवंडी गावचे सरपंच आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव ऋषिकेश शेलार यांनी प्रचार फेरी दरम्यान व्यक्त केला.
विरोधी उमेदवारांवर टीकास्त्र…
श्रीगोंदा तालुक्यात जो सर्वे झाला त्यात एका उमेदवाराचे नाव नव्हते त्यामुळे सध्याचे उमेदवार नाराज असतानाही कार्यकर्त्यांना पुढे घालून युवराज यांनी स्वतःकडे उमेदवारी खेचल्याचा आरोप करून हे युवराज सध्या ठेकेदारांकडून टक्केवारी उकळीत आहेत.
परंतु रस्त्याचे प्रश्न जैसे ते आहेत. शिरूर फाटा ते बेलवंडी हा रस्ता तीन महिन्यापूर्वी पूर्ण झाला. निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. यावरूनच युवराजांच्या कामाचा दर्जा समजतो अशी टीका शेलार यांनी केली. तर एका कायम पक्ष बदलणाऱ्या उमेदवाराने आर्थिक तडजोडी केल्याने जरी उमेदवारी मिळवीली तरी ती जनतेला रुचलेली नाही. त्यामुळे जनसामान्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
ज्या पक्षाची धोरणे,उमेदवारी मिळविण्या अगोदर जनतेसमोर मांडत होते. त्याच पक्षांच्या विरोधात त्या धोरणांना विरोध करण्याचे काम सध्याचे उमेदवार करत आहेत. लोकांना काही कळत नाही, लोकांना गृहीत धरणे हे साफ चुकीचे आहे, अशी टीका नागवडे यांच्यावर केली. तसेच कारखान्यातील ऊस उत्पादकांची देणी पूर्ण करूनच नंतर उमेदवारीचा निर्णय घ्यावयास हवा होत. अशी टीका राहुल जगताप यांच्यावरही केली.
वडिलांसाठी मुलाची जोरदार मोर्चे बांधणी!एवढ्या मताधिक्याने विजयी होण्याचा व्यक्त केला आत्मविश्वास!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १३, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: