वंचित चे उमेदवार "आण्णासाहेब शेलार" यांच्यासाठी ऍड प्रकाश आंबेडकरांची श्रीगोंद्यात सभा!


प्रशासक न्यूज,दि.१३ नोव्हेंबर २०२४ 

(श्रीगोंदा):श्रीगोंदा नगर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब हे दि.१६ नोव्हेंबर २०२४ रोजी श्रीगोंदा येथे दुपारी २:०० वाजता संत शेख महंमद महाराज मंदिर प्रांगणात जाहीर सभा घेणार आहेत.याबाबत अण्णासाहेब शेलार आणि वंचितचे प्रदेश प्रवक्ते, ॲड.अरुण जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी अण्णासाहेब शेलार यांनी आपली भूमिका मांडली.त्यांनी सांगितले की,गरीब मराठा,उपेक्षित,वंचित,दुर्लक्षित, कष्टकरी,शेतकरी आणि मागासवर्गीय बांधव त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत. यामुळे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा त्यांना विश्वास आहे. जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीचा अनुभव असल्यामुळे, विधानसभा निवडणुकीत यश मिळवणे सोपे जाईल असा देखील आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभेसाठी सुरेखा पुणेकर,किसन चव्हाण, अरुण जाधव आणि तालुक्यातील ओबीसी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रीगोंदा मतदारसंघातील प्रस्थापित राजकारण्यांच्या सत्तेचे विडंबन करीत शेलार म्हणाले की, २५-३० वर्षांच्या सत्ताधारी बदलांनंतरही येथील समस्या सुटल्या नाहीत. पाणीपुरवठा, अधिकाऱ्यांचे दिरंगाईचे काम आणि एमआयडीसी संबंधीचे मुद्दे प्रलंबित आहेत. याच कारखानदांराना सभेसाठी रोजंदारीवर कार्यकर्ते आणावे लागत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत “साखर विरुद्ध भाकर” अशा प्रकारची स्पर्धा दिसून येईल असे त्यांनी प्रतिपादन केले.

शेलार यांनी सांगितले की,या निवडणुकीत प्रस्थापित राजकारण्यांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी सामान्य जनता त्यांना योग्य न्याय देईल.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अरुण जाधव यांनी जरांगे फॅक्टरवर टीका करत ते बारामतीच्या ईशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला ॲड.आंबेडकरांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले होते, मात्र जरांगे यांनी ओबीसीतुन आरक्षणाचा हट्ट सोडला नाही..असे त्यांनी नमूद केले.

या पत्रकार परिषदेस अण्णासाहेब शेलार,अरुण जाधव, संतोष भोसले,ओमकार शिंदे,ओहळ,राऊत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

वंचित चे उमेदवार "आण्णासाहेब शेलार" यांच्यासाठी ऍड प्रकाश आंबेडकरांची श्रीगोंद्यात सभा! वंचित चे उमेदवार "आण्णासाहेब शेलार" यांच्यासाठी ऍड प्रकाश आंबेडकरांची श्रीगोंद्यात सभा! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १३, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.