लोकप्रतिनिधींकडून झालेला दुजाभाव चुकीचा..आमदार झाल्यावर मूलभूत प्रश्न सोडवण्याचे अनुराधा नागवडे यांचे आश्वासन!


प्रशासक न्यूज,दि.१५ नोव्हेंबर २०२४

श्रीगोंदा( प्रतिनिधी):-आमदार म्हणून पालकत्व स्वीकारल्यावर सर्वांना समान न्याय दिला पाहिजे पण शहराजवळील औटेवाडी परिसरात विजेचे दिवे आणि इतर विकास कामात लोकप्रतिनिधींनी केलेला दूजाभाव चुकीचा असून आपण आमदार झाल्यावर येथील मूलभूत प्रश्न सोडवू असे आश्वासन महाविकास आघाडी च्या उमेदवार सौ अनुराधा नागवडे यांनी शहराजवळील औटेवाडी येथे उपस्थित नागरिकांना दिले त्या म्हणाल्या या भागात सणवार,उत्सव,सुख, दुःख प्रसंगात आपण हजेरी लावल्याने येथील लोकांशी संपर्क चांगला आहे तसेच येथील लोकांना स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी केलेल्या कामाची माहिती आहे .येथील छोटे मोठे प्रश्न नागरिकांनी लोकप्रतिनिधी कडे मांडले पण केवळ आश्वासने मिळाली अशी टीका करून आपण मात्र प्रश्न सोडवू असे आश्वासन देखील यावेळी त्यांनी नागरिकांना दिले 

सुनंदा पाचपुते यावेळी बोलताना म्हणाल्या स्वर्गीय सदा आण्णा पाचपुते यांनी या भागात कामे केली,संघटन वाढवले याची आठवण येथील लोक सांगतात यापुढे देखील सौ.नागवडे हा स्नेह टिकवून कामे करतील सदा आण्णा यांनी २०१९ मध्ये नागवडे गटाला शब्द दिला होता तो आम्ही पूर्ण करत आहोत.

यावेळी लोकांनी प्रश्नाचा पाढा वाचत यापूर्वीच्या लोकप्रतिनिधी यांनी कामे केली नाहीत येथे तलाव असून देखील पाण्याबाबत दुर्लक्ष झाले ही कामे मार्गी लावण्याचे आवाहन नागवडे यांना केले.

माजी उपनगराध्यक्ष राजू दादा गोरे म्हणाले राज्यात स्व.यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील यांचे नाव घेतले जाते कारण त्यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या ज्याचा फायदा आजही लोकांना होतो त्याच प्रमाणे रस्ते,साखर कारखाना,पाणी,एस टी डेपो,शैक्षणिक संस्था या स्व.शिवाजीराव नागवडे यांनी आणल्या त्याचा फायदा आजही होतो त्यामुळे काम करणाऱ्या नागवडे कुटुंबाला मदत करण्याची गरज आहे त्यांना विजयी करावे असे आवाहन करून गोरे म्हणाले १५ वर्षापूर्वी नगरपालिका निवडणुकीत मी सर्व उमेदवारांत वयाने लहान होतो पण स्व.सदा अण्णा पाचपुते यांनी मला मदत केली आज सदा अण्णा पाचपुते यांचे कुटुंब नागवडे बरोबर आहेत म्हणून आम्ही मदत करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे,माजी नगराध्यक्षा सौ सुनीता शिंदे,एम.डी.शिंदे,शिवाजी शेळके,अशोक आळेकर यांच्यासह कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
लोकप्रतिनिधींकडून झालेला दुजाभाव चुकीचा..आमदार झाल्यावर मूलभूत प्रश्न सोडवण्याचे अनुराधा नागवडे यांचे आश्वासन! लोकप्रतिनिधींकडून झालेला दुजाभाव चुकीचा..आमदार झाल्यावर मूलभूत प्रश्न सोडवण्याचे अनुराधा नागवडे यांचे आश्वासन! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १३, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.