श्रीगोंदा(प्रतिनिधी):- राज्यातील शेतकरी,कष्टकरी, माता - भगिनी आणि विद्यार्थ्यांसह सर्व घटक महायुती सरकारच्या कारभाराला त्रासले असून या सर्वांना बदल हवा असून येत्या २० तारखेला होणाऱ्या निवडणुकीत हा बदल झालेला दिसेल असा विश्वास कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.ते म्हणाले लोकांना बदल हवा म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार राहुल गांधी यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली या तिघांच्या मार्गदर्शनाखाली आणि मित्र पक्षांच्या सहकार्याने जागा वाटप झाले श्रीगोंदा मतदार संघ शिवसेना लढवणार हे ठरले त्यांनी सौ.अनुराधा नागवडे यांना उमेदवारी जाहीर केली आता महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळून अनुराधा नागवडे यांचा प्रचार करून सौ.नागवडे यांना विजयी करण्याचे आवाहन कर्जत जामखेडचे आ.रोहित पवार यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील काही नेते कार्यकर्ते खासदार शरद पवार यांचा अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांना आशीर्वाद असल्याचे सांगत जगताप यांच्या प्रचारात भाग घेत होते मात्र आता आ.पवार यांच्या आवाहन मुळे श्रीगोंद्यातील महाविकास आघाडी मधील पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांना सौ.नागवडे यांनाच पाठिंबा द्यावा लागेल हे स्पष्ट झाले असून कार्यकर्ते,जनते मधील संभ्रम देखील आ.रोहित पवार यांच्या आवाहना मुळे दूर झाला आहे.
सर्वांनी आघाडी धर्म पाळून अनुराधा नागवडे यांना विजयी करण्याचे आ.रोहित पवार यांचे आवाहन!
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर १३, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: