अपक्ष उमेदवार सुवर्ण पाचपुते यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत मोठी रंगत!सौ पाचपुते यांच्यामुळे पंचरंगी लढत होणार


प्रशासक न्यूज,दि.१८ नोव्हेंबर २०२४

आपल्या राजकीय आयुष्यामध्ये कुठलेही मोठे पद न उपभोक्ता कसलेही मोठे आर्थिक पाठबळ नसताना सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर आणि एकनिष्ठेने केलेल्या कामांच्या जोरावर शेतकरी कुटुंबातील अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते निवडणूक लढवत आहेत. श्रीगोंदा - नगर विधानसभेची चौरंगी होत असलेली लढत त्यांच्यामुळे पंचरंगी होत आहे या निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी तो ठसा उमटवला असल्याचे लोकांमधून बोलले जात आहे.

मागील दोन-तीन महिन्यापासून श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामधील गावांमध्ये तब्ब्ल दोन वेळा झंजावाती दौरा सुवर्णा पाचपुते यांनी पूर्ण केला आहे असे गावकरी सांगत आहेत शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याची लेक असल्यामुळे सामान्य जनतेला त्या आपल्या वाटत असल्याचे चित्र त्यांनी केलेल्या गाव संवाद दौऱ्यामध्ये दिसत आहे सामान्य शेतकरी कुटुंबातील लोक त्यांच्या पाठीशी असल्याचे जाणवत आहे या निवडणुकीमध्ये त्या नक्कीच प्रभावशाली ठरतील असा विश्वास लोक व्यक्त करत आहेत.

दि.२० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र मधील विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज थंडावणार आहे. श्रीगोंदा - नगर विधानसभे मधील पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आपापल्या पक्षांमधील नेत्यांना सभेसाठी आमंत्रित करून मोठमोठ्या सभा घेतल्या. अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांनी कसली मोठी सभा न घेता सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा सर्वत्र होत आहे. त्यांच्या उमेदवारीची दखल लोकांनी घेतली आहे असेच म्हणावे लागेल.
अपक्ष उमेदवार सुवर्ण पाचपुते यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत मोठी रंगत!सौ पाचपुते यांच्यामुळे पंचरंगी लढत होणार अपक्ष उमेदवार सुवर्ण पाचपुते यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत मोठी रंगत!सौ पाचपुते यांच्यामुळे पंचरंगी लढत होणार  Reviewed by Prashasak on नोव्हेंबर १८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.