प्रशासक न्यूज,दि.२१ नोव्हेंबर २०२४
श्रीगोंदा विधानसभेसाठी काल एकूण ७२.२८%मतदान झाले यात १,३२,२७३पुरुष मतदारांनी तर १,१३,१३६महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एकूण २,४५,४०९मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली मतदान सुरु झाल्यानंतर दुपार पर्यत मतदारां मध्ये निरत्साह दिसून आला त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यत फक्त ४०%मतदान झाले होते परंतु सायंकाळी पाच वाजल्यानंतर मतदार घराबाहेर पडले त्यामुळे सायंकाळी पाच नंतर काष्टी,निमगाव खलू,मढेवडगाव,जुनी वांगदरी,श्रीगोंदा शहर, ढवळगाव सह अनेक ठिकाणी लोकांची मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लागल्याचे पाहायला मिळाली सहा वाजल्यानंतर जे मतदार रांगेत आहेत त्यांना चिठया वाटप करण्यात आल्या अनेक मतदान केंद्रावर रात्री उशीरा पर्यत मतदान प्रक्रिया सुरु होती श्रीगोंद्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता निवडणूक निर्णय अधिकारी व महसूल प्रशासन तसेच सर्वच निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडली
आता २३तारखेला होणाऱ्या मतमोजणी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे
महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी त्यांच्या वांगदरी या गावी पती राजेंद्र नागवडे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला तर महायुतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांनी त्यांच्या काष्टी या गावी वडील आमदार बबनराव पाचपुते आई प्रतिभा वहिनी आणि भाऊ प्रतापसिंह या आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला तर अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी पिंपळगाव पिसा या ठिकाणी तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आण्णासाहेब शेलार यांनी त्यांच्या बेलवंडी या गावी मतदानाचा हक्क बजावला अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांनी देखील काष्टी या गावी मतदान केले
मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास पोलिसांनी सक्त मज्जाव केला होता वयोवृद्ध,अपंग मतदारांनी देखील मोठ्या उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला
सायंकाळी पाच नंतर वाढला मतदानाचा टक्का, एकूण ७२.२८%मतदान
Reviewed by Prashasak
on
नोव्हेंबर २०, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: