धाकधूक वाढली,अंदाज येईना,निकालाकडे सर्वांचे लक्ष!


विशाल अ चव्हाण 
प्रशासक न्यूज,दि.२२ नोव्हेंबर २०२४

श्रीगोंदा विधानसभेसाठी २०तारखेला मतदान पार पडले मतदान झाल्यापासूनच निकालाबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे चौरंगी झालेली लढत प्रत्येक नेत्याने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत लावलेली ताकद सर्वच नेत्यांकडून झालेले जोरदार शक्तीप्रदर्शन,दमदार केलेला प्रचार यामुळे या निवडणुकीत प्रचंड रंगत आली असून पहिल्यांदाच कोणता उमेदवार निवडून येणार याबाबत खात्रीशीर वक्तव्य करणे मुश्किल झाले आहे मतदारांनी नेमके कोणत्या उमेदवाराच्या झोळीत मतांचे भरभरून दान टाकले याचा आज अंदाज लागण मुश्किल झालं आहे त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांसह सामान्य मतदारांमध्ये देखील निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आपलाच नेता निवडून येणार असा विश्वास वाटतं असला तरी मतदार राजाने "विजयी कौल"नेमका कोणत्या उमेदवारला दिला आहे हे पाहण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे निकालाची वेळ जशी जशी जवळ येत आहे तशी सर्वांची धाकधूक वाढली आहे शहरातील चौका चौकात गल्ली बोळात सगळीकडे एकच चर्चा कस होईल काय होईल काहींनी तर हाच उमेदवार निवडून येणार असे सांगत मोठ्या रकमेच्या पैंजा देखील लावल्या आहेत त्यामुळे उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

उद्या दि.२३ शनिवार रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावरील शासकीय धान्य गोदाम क्रं ३ या ठिकाणी ही मतमोजणी संपन्न होणार आहे

पोस्टल मतमोजणी करीता ११टेबल, ईटीपीबीएस,ऑनलाईन (सैनिक) मतमोजणी करीता ५ टेबल ची व्यवस्था करण्यात आली असुन त्यासाठी सुमारे १५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात एकूण ३४५ मतदान केंद्रे असून त्यासाठी एकूण १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. एका फेरीत १४ केंद्राची मतमोजणी होणार आहे. एकूण २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे.दुपार पर्यत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे

*महसूल सह पोलीस यंत्रणा सज्ज*
मतमोजणी व्यवस्थित पार पाडण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी गौरी सावंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार डॉ.क्षितीजा वाघमारे, नायब तहसिलदार पंकज नेवसे व त्यांची टीम अधिक परिश्रम घेत आहेत.

तसेच उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन पोलिसांनी केले असून पोलिस सर्व बारीक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत
धाकधूक वाढली,अंदाज येईना,निकालाकडे सर्वांचे लक्ष! धाकधूक वाढली,अंदाज येईना,निकालाकडे सर्वांचे लक्ष! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर २२, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.