निवडणुकीत निर्माण झालेला सस्पेन्स निकालात मात्र कुठे दिसलाच नाही!


प्रशासक न्यूज,दि.२३ नोव्हेंबर २०२४

श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेली चूरस निकालात मात्र पाहायला मिळाली नाही चौरंगी लढतीमुळे या निवडणुकीत मोठी रंगत आली होती त्यामुळे निवडून येणारा उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यात फार मोठा फरक असणार नाही विजयी उमेदवाराला मोठं मताधिक्य मिळणार नाही मतमोजणी दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारात विजय मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळेल असे वाटतं असतानाच आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर मात्र प्रत्यक्षात निकाल पूर्णपणे एकतर्फी लागत गेला भाजप चे विक्रम पाचपुते यांना पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य मिळाले त्यांचे हे मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यत कायम टिकून राहिले सर्व फेऱ्यामध्ये पाचपुते हे आघाडीवर राहिले तर सहाव्या फेरीपर्यत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेना(ऊ.बा.ठा)गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे या सातव्या फेरीपासून मात्र तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांना सातव्या फेरीपासूनच दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली ती शेवट्पर्यत कायम राहिली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आण्णासाहेब शेलार यांना २००९साली मिळालेल्या मतांएवढी मते देखील यावेळेस मिळवणे शक्य झाले नाही ते मताच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी राहिले तर भाजप मधून बंडखोरी केलेल्या अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सुवर्णा पाचपुते यांना १,७२५एवढी मते मिळाली

भाजपच्या विक्रम पाचपुते यांनी अटीतटीच्या लढतीत मात्र ३७,१५६ एवढ्या मोठ्या मताधिक्याने सहज विजय मिळवला मतमोजणी च्या काही फेऱ्या झाल्यानंतर विक्रम पाचपुते विजयी होणार हे स्पष्ट झाल्यानंतर जगताप व नागवडे गटाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी च्या ठिकाणाहून काढता पाय घेतला 
पाचपुते समर्थकांनी मात्र सकाळी काही फेऱ्यानंतर लगेच माऊली कार्यालयासमोर एकत्र येऊन आतिषबाजी करण्यास सुरुवात केली मतमोजणी केंद्राबाहेर पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती 

निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ क्षितिजा वाघमारे, निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्यासह प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मतमोजणी यशस्वीरित्या पार पाडली मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती

श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी त्यांचे सहकारी सहायक पो नि प्रभाकर निकम, सहायक पो. नि आहेरे,पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे,पो.उप.नी लिमकर या अधिकाऱ्यांसह गोपनीय विभाग व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता निकाला नंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी मोठी मेहनत घेतली

*उमेदवार त्यांचा पक्ष आणि त्यांना मिळालेली मते*
१)विक्रम पाचपुते(भाजप)---९९,८२०(विजयी)
२)राहुल जगताप(अपक्ष)--६२,६६४
३)अनुराधा नागवडे(शिवसेना ऊ.बा.ठा गट)---५४,१५१
४)ऍड महेंद्र शिंदे(बहुजन समाज पार्टी)--८०९
५)संजय शेळके(मनसे)---१०८४
६)आण्णासाहेब शेलार(वंचित बहुजन आघाडी)---२८,०७०
७)गोरख आळेकर---(जनहीत लोकशाही पार्टी)---४७४
८)दादा कचरे(राष्ट्रीय समाज पक्ष)--२८९
९)विनोद साळवे(सैनिक समाज पार्टी)-५०६
१०)डॉ.अनिल कोकाटे(अपक्ष)--६२९
११)दत्तात्रय वाघमोडे(अपक्ष)--४११
१२)नवशाद शेख(अपक्ष)---३५९
१३)रत्नमाला ठुबे(अपक्ष)--३९५
१४)राहुल छत्तीसे(अपक्ष)--४२४
१५)सागर कासार(अपक्ष)--४४७
१६)सुवर्णा पाचपुते(अपक्ष)--१,७२५
नोटा---१०३३

निवडणुकीत निर्माण झालेला सस्पेन्स निकालात मात्र कुठे दिसलाच नाही! निवडणुकीत निर्माण झालेला सस्पेन्स निकालात मात्र कुठे दिसलाच नाही! Reviewed by Prashasak on नोव्हेंबर २३, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.