मतांच्या विभागणीसह विक्रम यांची संयमी खेळी भरली विरोधकांना भारी,मताधिक्याचा "विक्रम"करत विजयावर शिक्कामोर्तब


प्रशासक न्यूज,दि.२४ नोव्हेंबर २०२४
विशाल अ चव्हाण

श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत ज्या ज्या वेळेस पाचपुते यांच्या विरोधात एकापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले त्या त्या वेळेस विरोधी उमेदवारांच्या झालेल्या मत विभागणीचा फायदा हा पाचपुते यांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे पाचपुते यांचा पराभव करायचा असल्यास त्यांच्यासमोर एकास एक उमेदवार उभा करणे गरजेचे आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आलेले असूनसुद्धा आता या निवडणुकीत विक्रमसिंह पाचपुते यांच्या विरोधात तीन उमेदवार उभे ठाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांची विभागणी होऊन विक्रमसिंह पाचपुते यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला विक्रम सिंह पाचपुते यांच्या विरोधात नागवडे किंवा जगताप यांच्यापैकी एकच उमेदवार उभा असता तर निकाल वेगळा लागला असता हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे व अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्या मतांची एकत्रित बेरीज केल्यास निकाल काय लागला असता हे दिसून येते

*पाडापाडी आणि जिरवाजिरवीच्या राजकारणात विक्रम पाचपुते यांचा फायदा*
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत जगताप आणि नागवडे कुटुंबाने एकत्रित येऊन आ बबनराव पाचपुते यांचा पराभव केला एकत्रित राजकारणाचा फायदा तेव्हा दिसून येऊन सुद्धा त्यानंतर मात्र जगताप व नागवडे हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू बनले या दोन्ही कुटुंबांनी पाचपुतेना विरोधक मानन्याऐवजी एकमेकांना च राजकीय शत्रू बनवून कायम विरोध केला आत्तासुधा पाचपुते यांच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा करावा अशी अनेक कार्यकर्त्यांची ईच्छा असताना सुद्धा एकमेकांची जिरवा जिरवी आणि पाडापाडी च्या सूड भावनेचे राजकारण हे पुन्हा पाचपुते यांच्या पथ्यावर पडले महाविकास आघाडीची उमेदवारी राहूल जगताप यांना मिळणार असे निश्चित झालेले असूनसुद्धा ऐनवेळी राजेंद्र नागवडे यांनी त्यांचा पत्ता कट करत आपल्या पत्नी अनुराधा यांच्यासाठी दोन दिवसात उमेदवारी मिळवली त्यामुळे जगताप यांचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आणि त्यामुळे जगताप आणि नागवडे यांच्यातील वादाचा चांगलाच भडका झाला त्यामुळे जगताप आणि नागवडे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आणि तिथंच विक्रमसिंह यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला

*लाडक्या बहिणींची विक्रम यांना भाऊबीज*
राज्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या आधी काही दिवस सुरु केली त्याचा परिणाम श्रीगोंद्यात दिसून आला महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले त्याचा फायदा विक्रमसिंह पाचपुते यांना झाला आणि चौरंगी लढत असूनसुद्धा विक्रमी मताधिक्य घेत पाचपुते विजयी झाले

*विरोधकांची टोकाची टीका तरी विक्रमसिंह यांची संयमी खेळी*
या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी बदलावरून किंवा विकासकामावरून विक्रम पाचपुते यांना टार्गेट करत विरोधकांनी त्यांच्यावर टोकाची टीका केली त्याला विक्रम पाचपुते यांनी कोणतेही प्रत्युत्तर न देता विकास कामांचा मुद्दा पुढे करत ही निवडणूक लढवली सांगता सभेतील विक्रम पाचपुते यांचे संयमी भाषण सगळ्यांनाच भावले त्यामुळे पाचपुते यांची ही संयमी खेळी यशस्वी ठरली आणि ते विजयी झाले

*पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांच्या एकीचा विक्रम यांच्या विजयात सिंहाचा वाटा*
आ बबनराव पाचपुते यांना श्रीगोंदा तालुक्यात मानणारा मोठा वर्ग आहे विक्रमसिंह पाचपुते यांच्या उमेदवारी वरून पाचपुते यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र बबनराव पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांनी तितकाच विश्वास विक्रम यांच्यावर दाखवत एकजुटीने काम केल्यामुळे सुद्धा विक्रम यांना यश संपादन करणे शक्य झाले

*राहुल जगताप यांना मिळालेली मते देखील निर्णायक*
राहुल जगताप यांना तिकीट वाटपात डावलले गेल्यानंतर सोबत कुठलाही मोठा नेता नाही कुठल्या ही पक्षाची ताकद नाही हे माहीत असूनसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाच्या जोरावर त्यांनी ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढवली त्यांना या निवडणुकीत मिळालेला प्रतिसाद कौतुक करण्यासारखाच आहे तसेच या निवडणूकित अपक्ष असूनसुद्धा त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मिळवलेली मते हे त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचे आणि सूक्ष्म नियोजनाचा भाग म्हणावा लागेल तर नागवडे यांचे नियोजन शेवटच्या दोन दिवसात कमी पडल्यामुळे अनुराधा नागवडे या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या त्यामुळे ही निवडणूक विक्रम पाचपुते विरुद्ध राहुल जगताप अशीच झाल्याचे पाहायला मिळाले

तसेच वंचित चे आण्णासाहेब शेलार यांनी प्रचार सभेत मोठं शकतीप्रदर्शन केल्यामुळे निकालात ट्विस्ट निर्माण झाला होता परंतु शेलार यांना मात्र त्याच मतात रूपांतर करण्यात अपयश आले २००९पेक्षा देखील या निवडणुकीत त्यांना कमी मते मिळाली


मतांच्या विभागणीसह विक्रम यांची संयमी खेळी भरली विरोधकांना भारी,मताधिक्याचा "विक्रम"करत विजयावर शिक्कामोर्तब  मतांच्या विभागणीसह विक्रम यांची संयमी खेळी भरली विरोधकांना भारी,मताधिक्याचा "विक्रम"करत विजयावर शिक्कामोर्तब Reviewed by Prashasak on नोव्हेंबर २४, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.