थार गाडीने तीन जणांना उडवले तिन जणांची प्रकृती गंभीर


प्रशासक न्यूज,दि.२५ नोव्हेंबर २०२४

श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील बस स्टॅन्ड वरती आज दि.२५ सोमवारी सकाळी सातच्या सुमारास थार गाडीने ( MH-12-WP-8933 ) तीन जणांना उडवले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते सविस्तर वृत्त असे की सकाळी सातच्या सुमारास ढवळगाव बस स्टँड वरती कॉलेजला जाण्यासाठी एसटीची वाट पाहत असलेली विद्यार्थी व प्रवासी थांबले असता.रस्त्याच्या दहा फुट लांब एका पाटी च्या मागे थंडी वाजत असल्यामुळे ते शेकोटी करून शेकत थांबले होते. त्याच वेळेस अचानक भरधाव वेगाने गाडी सुसाट येऊन तिघांना उडवले त्यामध्ये सुभाष नारायण आढाव,शिवाजी नारायण आढाव दोघे राहणार आरणगाव दुमाला  तेजश बाळु शिंदे रा.ढवळगाव हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यातील दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे अशी माहिती मदत कार्य करणाऱ्या प्रथमदर्शी कडून समजली आहे जखमीना पुढील उपचारासाठी शिरूर येथे पाठवण्यात आले आहे 

मोठा अनर्थ टळला
पाच मिनिटांपूर्वीच त्या ठिकाणावरून एसटी शिरूर कडे गेली होती त्यावेळी वीस ते पंचवीस विद्यार्थी त्या एसटीमध्ये तिथून गेले होते त्यामुळे ते विद्यार्थी असताना हा अपघात झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती परंतु ते बसने निघून गेल्यामुळे अन्यथा मोठा अनर्थ टळला

(माहिती सौजन्य-पत्रकार अमोल बोरगे)
थार गाडीने तीन जणांना उडवले तिन जणांची प्रकृती गंभीर थार गाडीने तीन जणांना उडवले  तिन जणांची प्रकृती गंभीर Reviewed by Prashasak on नोव्हेंबर २४, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.