प्रशासक न्यूज,दि.३१ऑक्टोबर २०२४
विशाल अ चव्हाण
भाजप कडून श्रीगोंद्यात आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच भाजप च्या गोटात सगळं काही अलबेल आहे असे चित्र नव्हते उमेदवारी जाहीर होताच काष्टी येथील मोजक्या कार्यकर्त्यांच्या सुरु असलेल्या संवाद मेळाव्यातून रात्रीचेचे आमदार पाचपुते हे पत्नी व उमेदवारी जाहीर झालेल्या प्रतिभा पाचपुते यांच्यासह थेट मुंबईला गेले होते त्यावेळीच श्रीगोंद्यात पाचपुते हे उमेदवारी बदलून आपला मुलगा विक्रम पाचपुते यांना उमेदवारी देणार अशी चर्चा रंगू लागली होती परंतु आज श्रीगोंद्यात पाचपुते यांच्या माऊली निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकित विक्रमसिंह पाचपुते यांनीच निवडणूक लढवावी अशी मागणी झाली त्यावर आ बबनराव पाचपुते यांनी देखील कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेत्यांना कळवून निर्णय घेऊ असे सांगितले
उमेदवारी बदलावर निर्णय झाला असून भाजपकडून आता विक्रमसिंह पाचपुते निवडणूक लढवणार असल्याबाबत भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे
तसेच आमदार बननराव पाचपुते यांच्या प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिभा पाचपुते यांनी सांगितल्यामुळे आता श्रीगोंद्यात भाजपकडून विक्रम पाचपुते यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे विक्रम पाचपुते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे ४ तारखेला अर्ज माघारी नंतर विक्रम पाचपुते हेच भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे
आ.आमदार बबनराव पाचपुते हाच आमचा पक्ष व ते सांगतील तोच उमेदवार अशा भावना व्यक्त करून पाचपुते देतील तो उमेदवार आम्ही निवडून आणणार असे मत आज माऊली येथे पार पडलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले या बैठकीसाठी पोपटराव खेतमाळीस, गणपतराव काकडे, बाळासाहेब महाडीक, प्रताप पाचपुते,माऊली हिरवे, मारुती औटी, बाबासाहेब काळे, सुभाष निमसे, संतोष भापकर,नानासाहेब कोथंबिरे,पुरुषोत्तम लगड, मिलिंद दरेकर तसेच प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्ते उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांनी चर्चेदरम्यान विक्रम पाचपुते यांचीच उमेदवारी द्या अशी आग्रही मागणी केली.
त्यावर माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाच्या वरिष्ठांना कळवू व निर्णय घेऊ असे सांगितले.
प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी डॉ.प्रतिभा पाचपुते व विक्रम पाचपुते यांच्या उमेदवारी बाबत भावना व्यक्त केल्या.

*कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठाना कळवल्यावर दोन तीन दिवसात निर्णय होईल*
उमेदवारी बदलाबाबत विक्रमसिंह पाचपुते यांच्याशी संपर्क साधला असता कार्यकर्त्यांनी आपण निवडणूक लढवावी या भावना असून त्या वरिष्ठाना कळवल्या जातील त्यावर दोन तोन दिवसात निर्णय होईल अशी प्रतिक्रिया विक्रमसिंह पाचपुते यांनी दिली
उमेदवार बदलणार!भाजप कडून विक्रमसिंह पाचपुते लढणार!
Reviewed by Prashasak
on
ऑक्टोबर ३१, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: