श्रीगोंद्यात दोन गटात तुफान ऱ्हाडा!दहा ते बारा जण जखमी


प्रशासक न्यूज,दि.३नोव्हेंबर २०२४

श्रीगोंदा शहरातील ससाणे नगर येथे काल रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान अगदी किरकोळ कारणातून दोन गटात तुफान हाणामारी झाली त्यानंतर झालेल्या जोरदार दगडफेकीच्या घटनेत एकूण दहा ते बारा जण जखमी झाले असून यात महिलांचा देखील समावेश आहे एका व्यक्तीला डोक्याला डोक्याला दगड लागल्यामुळे त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

घटनेची माहिती समजताच पोलीस राज्य राखीव दलाच्या तुकडीसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली हाणामारीच्या घटनेनंतर महिला पुरुष आणि तरुणांसह शेकडो लोकांचा जमाव श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जमला होता मध्यरात्री उशिरा पर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते

काही प्रत्यक्षदर्शीकडून समजलेली माहिती अशी की काल रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ससाणे नगर येथे लहान मुलं फटाके वाजवत असताना तिथून जवळच राहणाऱ्या एका वस्तीवरील तरुण ट्रिपलशीट दुचाकीवरून भरधाव वेगात तिथून गेले त्यानंतर ससाणे नगर मधील काहीजणांनी या तरुणांना गाडी सावकाश चालवा असे सांगितले या किरकोळ करणातून ते तरुण आणि ससाणे नगर मधील लोकांमध्ये वाद झाला त्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले त्यानंतर या ठिकाणी जोरदार दगडफेक झाली तसेच विटा देखील एकमेकांना फेकून मारण्यात आल्या यात दोन्ही गटाचे लोक चांगलेच जखमी झाले काहींच्या पायाला हाताला तर काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे

जखमी वर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले दोन गटात किरकोळ कारणातून झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते सध्या त्याठिकाणी शांतता आहे
श्रीगोंद्यात दोन गटात तुफान ऱ्हाडा!दहा ते बारा जण जखमी श्रीगोंद्यात दोन गटात तुफान ऱ्हाडा!दहा ते बारा जण जखमी Reviewed by Prashasak on नोव्हेंबर ०२, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.