प्रशासक न्यूज,दि.१३ऑगस्ट२०२४
भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन” तसेच "कारगिल विजय दिनाला" २५ वर्षे पूर्ण झाल्याने "रौप्य महोत्सवी सोहळा" गुरुवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक (१०:३०) वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री ना. मा.श्री. अजितदादा पवार व अनेक मंत्री महोदय तसेच सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड, पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सतीश हेंग यांच्या प्रमुख उपस्थितीत "गजानन मंगल कार्यालय, लोहगाव, पुणे” येथे "ध्वजारोहण करून तसेच कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर सैनिकांना मानवंदना देऊन...अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून" साजरा करण्यात येणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दीपकराजे शिर्के यांनी दिली आहे
याप्रसंगी कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विर-पत्नी, कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या वीर सैनिकांचा व माजी सैनिकांचा सन्मान ना.अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमात अजित पवार हे वीर-पत्नी व माजी सैनिकांच्या विविध प्रश्नावर प्रत्येक्ष संवाद साधणार आहेत
उपमुख्यमंत्री अजित पवार साधणार माजी सैनिक,आणि वीर पत्नींशी संवाद/-प्रदेशाध्यक्ष दीपक राजे शिर्के
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १२, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: