कायद्याचा धाक आतातरी निर्माण होईल का? श्रीगोंदेकरांसाठी आशेचा नवा 'किरण'


विशाल अ चव्हाण 
प्रशासक न्यूज,दि.१३ऑगस्ट२०२४

मागील काही वर्ष्यापासून श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडतं असलेल्या गुन्हेगारीच्या घटना बघता श्रीगोंद्यात पोलिसांचा आणि एकाअर्थी कायद्याचा धाक राहिलाय का नाही असाच प्रश्न उपस्थित होत आहे पोलीस स्टेशन समोर येऊन तिथल्या कुंड्यांची तोडफोड करणे, पोलीस स्टेशनच्या आवारात मोठा जमाव जमणे,विशिष्ट समाजातील लोकांची पोलीस स्टेशनसमोरच होणारी भांडणे पोलिसांसमोरच भांडण करण्याची तरुणांची गेलेली मजल,पोलीस ठाण्याच्या आवारातच बेशिस्त पद्धतीने लावलेली वाहने,शहरात मोठ्या आवाजात वाजणारे डीजे अश्या गोष्टी दररोज बघायला मिळत आहेत त्यामुळे श्रीगोंद्यात पोलिसिंग संपली की काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे याला पोलीस निरीक्षकांचा ढिलेपणा कारणीभूत ठरला आहे पोलीस निरीक्षक भोसले यांच्या काळात दूधभेसळ प्रकरण मलई खाल्ल्याच्या आरोपांमुळे चांगलेच गाजले पो नि भोसले यांची कारकीर्द पाहता ते श्रीगोंद्यात अपयशी ठरले असेच म्हणावे लागेल

आता श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांची अ नगर नियंत्रण कक्षात बदली झाली आहे त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील किरण बाजीराव शिंदे यांची श्रीगोंदा पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे आज दुपारी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत परंतु हा कार्यभार स्वीकारत असतानाच त्यांच्या खांद्यावर श्रीगोंदे करांच्या अपेक्षांचा भार असणार आहे तसेच कायदा सुव्यवस्थेची घडी पुन्हा बसवण्यासोबत समाजात गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे त्यामुळे नवीन येणाऱ्या पोलीस निरीक्षकांच्या रूपाने पुन्हा कायद्याचे राज्य निर्माण होईल असा आशेचा 'किरण' श्रीगोंद्यातील जनतेला दिसत आहे

कायदा सुव्यवस्थेची घडी बसवण्यासोबतच कामासाठी पोलीस स्टेशनला गेल्यावर पैसे मोजावे लागतात पैसा फेक तमाशा देख ही श्रीगोंदा पोलीस स्टेशनची समाजात निर्माण झालेली इमेज सुद्धा नव्याने रुजू होत असलेल्या

पो नि किरण शिंदे यांना सुधारावी लागणार आहे तसेच कोणत्याच राजकीय नेत्याच्या दबावाला बळी न पडता पारदर्शक कारवाई त्यांना करावी लागणार आहे

त्यामुळे पो नि शिंदे हे कायद्याचा धाक पुन्हा निर्माण करून श्रीगोंदेकरांच्या अपेक्षा पूर्ण करतात की पुन्हा येरे माझ्या मागल्या म्हणत भ्रमनिरास करतात हे मात्र त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर काही दिवसातच समजेल.



कायद्याचा धाक आतातरी निर्माण होईल का? श्रीगोंदेकरांसाठी आशेचा नवा 'किरण' कायद्याचा धाक आतातरी निर्माण होईल का? श्रीगोंदेकरांसाठी आशेचा नवा 'किरण' Reviewed by Prashasak on ऑगस्ट १२, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.