प्रशासक न्यूज,दि.१५ऑगस्ट२०२४
श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी किरण शिंदे हे रुजू होऊन दोन दिवस उलटलेले नसतानाच आज श्रीगोंदा शहरात भरदिवसा घडफोडीची घटना घडली असून पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर ही धाडसी चोरी झाल्यामुळे चोरट्यानीं एक प्रकारे नवीन पोलीस निरीक्षकांना सलामीच दिली आहे
श्रीगोंदा न्यायालयासमोरील त्रिमूर्ती अपार्टमेंट मध्ये ही चोरीची घटना आज सकाळी सात ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली या चोरीबाबत ऍड पुरुषोत्तम फाटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे
सोन्या चांदीचे दागिने,रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ७३हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यानीं लंपास केला आहे आज सकाळी ऍड फाटे हे आपल्या परिवारासह घराबाहेर गेले असता चोरट्यानीं त्यांच्या घराचा लोखंडी दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून ही धाडसी चोरी केली
भरदिवसा पोलीस स्टेशन पासून जवळ ही धाडसी चोरी झाल्यामुळे या चोरीसह या आधी झालेल्या घरफोड्यांचा तपास करण्याचे आव्हान नवीन पोलीस निरीक्षकांसमोर असणार आहे
*साहेब सत्कारातून बाहेर या कामाला लागा*
पोलीस निरीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर स्वागत करण्यासाठी अनेक लोकांनी पोलीस स्टेशनला रिघ लावली आहे नवीन आल्यामुळे साहेबांचा सत्कार करणं यात गैर नसलं तरी सत्कार करणाऱ्यांमध्ये अवैध व्यवसायिकांचीच संख्या जास्त आहे विशेष म्हणजे साहेबांकडून देखील त्याचा मोठ्या मनाने स्वीकार केला जात आहे हे ही विशेष त्यामुळे या सत्काराची आता बाहेर लोकांमध्ये चांगलीच चर्चा रंगत असून साहेब आता सत्कारातून बाहेर या आणि कामाला लागा अशी ईच्छा नागरिक व्यक्त करत आहेत
*पोलीस निरीक्षकांचा अजब सल्ला*
सदर सत्काराबाबत पोलीस निरीक्षकांना विचारले असता पोलीस निरीक्षकांनी यावर अजब सल्ला देत मी नवीन आहे मला कोण कसे आहे याबाबत माहिती नाही असे सांगत अश्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असा उलट सल्ला दिला तसेच कारवाईसाठी विविध खाते कार्यरत असून फक्त पोलिसांची जबाबदारी नसल्याचे सांगायला ते विसरले नाहीत त्यामुळे कायदा सुवस्था राखण्याची जबाबदारी नेमकी कुणाची हा प्रश्न आता उपस्थित होत आहे
पोलीस निरीक्षकांना चोरांची सलामी!स्वागत झाले आता तपासाचे आव्हान
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १५, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: