प्रशासक न्यूज,दि.१७ऑगस्ट२०२४
जेवण झाल्यानंतर शतपावली करत असणाऱ्या व्यक्तीला एका स्विफ्ट कारणे जोरदार धडक दिल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून या भरधाव कारणे त्याचठिकाणी एका दुचाकीला देखील धडक दिली असून दुचाकी चालक देखील जबर जखमी झाला आहे त्याची तब्बेत चिंताजनक आहे त्याच्यावर श्रीगोंद्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत
श्रीगोंदा जामखेड रस्त्यावर शहरातील औटेवाडी येथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हि दुर्दैवी घटना घडली आहे गणपत तुळशीराम औटी अंदाजे वय ४० यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे
या अपघाताबाबत नागरिकांकडून समजेलेली माहिती अशी की रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास औटी हे जेवण करून रस्त्याच्या बाजूने फिरत होते त्याचवेळी या रस्त्याने भरधाव वेगात आलेल्या एका स्विफ्ट कारने त्यांना जोराची धडक दिली हि धडक एवढी जोरात होती की औटी उडून पडले त्यात त्यांना जबर मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले त्यानंतर उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच औटी यांचा मृत्यू झाला
याच भरधाव कारने त्याच ठिकाणी रस्त्याने जात असलेल्या एका दुचाकीस्वाराला देखील उडवले त्यात तो जखमी झाला आहे दोन लोकांना उडवून ती कार अंधाराचा फायदा घेत भरधाव वेगात निघून गेली त्यानंतर लोकांनी जखमी दुचाकी स्वराला श्रीगोंद्यात उपचारासाठी दाखल केले
असा विचित्र अपघातात एका व्यक्तीला आपला नाहक जीव गमवावा लागल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून धडक देणाऱ्या कारचा पोलिसांनी शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी औटेवाडी येथील नागरिक करत आहेत
पादचाऱ्यासह,दुचाकीला उडवले एक जण ठार,श्रीगोंद्यातील घटना!
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट १६, २०२४
Rating:
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: