अधिकाऱ्याला बेशरमचा हार,संभाजी ब्रिगेड आक्रमक!



प्रशासक न्यूज,दि.२०ऑगस्ट २०२४

मागील एक ते दोन दिवसांपासून श्रीगोंदा शहरात वीज गायब आहे शहरातील हनुमान नगर,बालाजी नगर या परिसरात तर तीन दिवसांपासून वीज आलेली नाही त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे विजच नसल्यामुळे लोकांना ऐन पावसाळ्यात टँकरणे विकत पाणी घ्यावे लागत आहे याच वीजप्रश्नावर श्रीगोंद्यात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून वीज मंडळाच्या ढीसाळ कामाचा निषेध व्यक्त करण्यासाठी वीज वितरणचे सहायक अभियंता कावरे यांना बेशरमच्या पानाचा हार घालत अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे,जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे, तालुकाध्यक्ष प्रसाद काटे,जिल्हा संघटक गणेश पारे,सागर हिरडे उपस्थित होते


श्रीगोंदा शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पाऊसात विजेच्या तारा तुटल्या होत्या परंतु दोन दिवस उलटूनसुद्धा विजपुरवठा सुरळीत करण्यास महावीतरण अपयशी ठरले आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी वीज वितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले त्याचवेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते त्याठिकाणी गेले त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच फैलावर घेतले यावेळी उपस्थित नागरिकांनी विजमंडळाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रमक आंदोलन छेडण्याचा ईशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला

अधिकाऱ्याला बेशरमचा हार,संभाजी ब्रिगेड आक्रमक! अधिकाऱ्याला बेशरमचा हार,संभाजी ब्रिगेड आक्रमक! Reviewed by Prashasak on ऑगस्ट २०, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.