प्रशासक न्यूज,दि.२६ऑगस्ट२०२४
श्रीगोंदा शहराच्या विविध भागात घरफोडी, जबरी चोरीच्या घटना मागील काही दिवसांपासून घडल्या आहेत यात लाखोंचा मुद्देमाल चोरट्यानीं लंपास केला आहे परंतु या घटना घडून काही महिने उलटूनसुद्धा पोलिसांना या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात अपयश आले आहे
मागे घडलेल्या चोरीच्या घटनांचा छडा लावून आरोपी जेरबंद करत मुद्देमाल जप्त करण्याचे आवाहन नवीन पोलीस निरीक्षकांसमोर असणार आहे
नुसत्या या घटनांचा तपास लावून त्यावर थांबता येणार नाही तर येत्या काही दिवसात दिवाळीचा सण येणार आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत या घरफोडीच्या घटना थांबवण्याचे सुद्धा आवाहन पोलिसांसमोर असणार आहे
*दुचाकी,मोबाईल चोरी चे मोठे रॅकेट सक्रिय त्याचा तपास होणे गरजेचे*
श्रीगोंद्यात दुचाकी मोठ्या प्रमाणात चोरीला जात आहेत तसेच प्रत्येक सोमवारी आठवडे बाजारातून महागड्या कंपनीचे लोकांचे मोबाईल चोरीला जात आहेत याबाबत अनेक तक्रारी पोलीस स्टेशनला नोंद होऊन सुद्धा त्याचा छडा लावण्यात पोलीस अपयशी ठरल्याचे दिसत आहेत दोन दिवसांपूर्वीच जामखेड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ३६ दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला त्याच धर्तीवर श्रीगोंद्यात कारवाई अपेक्षित आहे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक कायद्याचा गाढा अभ्यास असल्याचे सांगत आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या या अभ्यासाचा वापर करून या दुचाकी व मोबाईल चोरांचा छडा लावावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत
*तपासा सह कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस खात्याचीच*
प्रत्येक गोष्टीवर कारवाई करण्यासाठी वेगवेगळी खाती असून सर्व जबाबदारी पोलीसांची नसल्याचे अधिकारी सांगत असले तरी श्रीगोंदा शहरासह तालुक्यात होत असलेल्या चोरीच्या घटनांचा छडा लावून चोरट्यांच्या भीतीमधून नागरिकांची सुटका करणं आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मात्र पोलीस खात्याचीच असते हे हि तितकंच खरं
त्यामुळे आता येणाऱ्या काळात या सर्व घटनांचा तपास कसा होतो याकडे सामान्य श्रीगोंदकरांचे लक्ष लागले आहे
श्रीगोंदा तालुक्यातील या गुन्ह्यांचा छडा कधी लागणार? तपासाला गती मिळणे गरजेचे!
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट २६, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: