प्रशासक न्यूज,दि.२७ऑगस्ट२०२४
समोर चाललेला दुचाकी चालक अचानक वळाल्यामुळे दुचाकीला वाचवण्याच्या नादात दुचाकीला धडक देऊन लक्झरी खड्ड्यात जाऊन कोसळल्यामुळे भीषण अपघात झाला असून या अपघातात लक्झरी चालक आणि दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास नगर दौंड रस्त्यावर बाबूर्डी फाट्यावर घडली आहे या भीषण अपघातात दैव बलवत्तर म्हणून लक्झरीमधील सात ते आठ प्रवासी बचावले असून ते किरकोळ जखमी झाले आहेत
या अपघातात मयत झालेला बस चालक हा गुजरात राज्यातील असून दुचाकी चालक हे बाबूर्डी घुमट गावातील असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून समजली
आज सायंकाळी दौंडवरून नगरकडे गुजरात राज्यातील सदर लक्झरी बस जात असताना बाबूर्डी फाट्यानजिक बस समोर चाललेला दुचाकी चालक अचानक दुसऱ्या बाजूला वळला त्यामुळे बस चालकाने त्याला वाचवण्यासाठी जोरदार ब्रेक दाबला परंतु लक्झरी बस ला जास्त स्पीड असल्यामुळे बस ने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर बस बाजूच्या एका खड्ड्यात जाऊन पलटी झाली हा अपघात एवढा भीषण होता की याचा आवाज काही किमी अंतरावर गेला त्या आवाजाने आजूबाजूचे लोक काही वेळातच घटनास्थळी आले स्थानिक व्यवसायिक व तरुण यांनी तातडीने मदतीचे चक्र फिरवले लक्झरी बस मधील सात ते आठ प्रवाश्याना सुखरूप बाहेर काढले
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती या अपघातामुळे या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे
भीषण अपघात २ जण जागीच ठार!
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट २८, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: