हे चोर पकडले,मुद्देमाल हस्तगत!



प्रशासक न्यूज,दि.३१ऑगस्ट२०२४

श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून अनेक दुचाकी चोरीला जात असल्याच्या तक्रारी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दाखल होत होत्या त्याचा तपास करण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते 

त्यामुळे श्रीगोंदा पोलिसांनी या दुचाकी चोरांचा पर्दाफाश करण्यासाठी शहरात विना क्रमांकाच्या दुचाकी चालकांविरोधात मोहीम उघडली आहे याच मोहिमेदरम्यान श्रीगोंदा पोलिसांनी सोन्या उर्फ अनिल मोतीराम आल्हाट रा.वेळूरोड(श्रीगोंदा), आणि त्याचे दोन साथीदार सत्यवान दादा जाधव रा.अजनूज,विशाल प्रकाश रंधवे रा. शिवाजीनगर(श्रीगोंदा)या तीन दुचाकी चोरांसह त्यांच्याकडून १,८०,०००रुपये किंमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत या आरोपीना न्यायालयाने ३सप्टेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पो हे कॉ मुकेश बडे करत आहेत

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,दि.२७ऑगस्ट रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो कॉ संदीप राऊत व पो कॉ पवार हे शहरात गस्त घालत असताना बस स्थानक परिसरात त्यांना एका विना नंबर प्लेट ची दुचाकी जाताना दिसली त्यांनी त्या दुचाकी चालकाला थांबण्यास सांगितले असता तो दुचाकी चालक पळून जाऊ लागला पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून सखोल चौकशी केली असता सदर दुचाकी चोरीची असून अजून दुचाकी चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले सदर व्यक्ती हा सोन्या उर्फ अनिल मोतीराम आल्हाट रा.वेळूरोड(श्रीगोंदा)असल्याचे तपासात निष्पन्न झाले तसेच इतर चोरलेल्या दुचाकी त्याने त्याचे मित्र सत्यवान दादा जाधव रा. अजनूज आणि विशाल प्रकाश रंधवे रा शिवाजीनगर(श्रीगोंदा)यांना विकल्याचे सांगितले पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून इतर चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पो नि किरण शिंदे,पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे,पो ना गोकुळ इंगवले,पो कॉ पवार, आनंद मैड, संभाजी गर्जे,संदीप राऊत,संदीप शिरसाठ,संदीप आजबे, संदीप जाधव यांनी केली या कामी त्यांना अ नगर सायबर सेलचे पो कॉ नितीन शिंदे,पो कॉ राहुल गुंडू यांनी मदत केली

हे चोर पकडले,मुद्देमाल हस्तगत! हे चोर पकडले,मुद्देमाल हस्तगत! Reviewed by Prashasak on ऑगस्ट ३१, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.