श्रीगोंद्यात दादा,आण्णा,भैय्या आणि वहिनींसह आर्धा डझन इच्छुक,इच्छुकांच्या भाऊ गर्दीत उमेदवारीची लॉटरी नेमकी कुणाला?
विशाल अ चव्हाण
प्रशासक न्यूज,दि.९ऑगस्ट २०२४
विधानसभा निवडणुक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे निवडणूक जशी जवळ येत चाललीये तशी श्रीगोंद्यात विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची यादी वाढतच चालली आहे २०१९साली विधानसभेला तिकीट मिळत असून सुद्धा निवडणूक न लढवण्याचा पवित्रा घेतलेल्या नेत्यांसह आता तालुक्यातील सर्वच प्रमुख नेत्यांना आमदार व्हायची स्वप्ने पडू लागलीत
*दोन दादा,दोन आण्णा,एक भैय्या आणि एक वहिनी असे अर्धा डझन इच्छुक*
आमदार बबनराव पाचपुते(दादा),माजी आमदार राहुल(दादा)जगताप,घनश्याम(आण्णा) शेलार,अनुराधा(वहिनी)नागवडे,साजन (भैय्या)पाचपुते आणि नुकतीच आपल्या उमेदवारीची घोषणा करणारे आण्णासाहेब शेलार असे दोन दादा,दोन आण्णा,एक भैय्या आणि एक वहिनी असे आताच आर्धा डजन इच्छुक उमेदवार शड्डु ठोकून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत निवडणूक जवळ आल्यावर या इच्छुकांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे
इच्छुक उमेदवारांची यादी मोठी असली तरी महाविकास आघाडी,महायुती यांच्याकडून उमेदवारीची लॉटरी कुणाला लागणार आणि अपक्ष कोण निवडणूक लढवणार याबाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या फु्टीमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर सुद्धा माजी आमदार राहुल जगताप हे शरद पवार यांच्यासोबत राहिले त्यामुळे श्रीगोंद्यात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ते इच्छुक असून त्यांची उमेदवारी फिक्स असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत त्यातच शिवसेनेचे उपनेते काष्टीचे सरपंच आणि आ पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी आपल्या शहरातील संपर्क कार्यलयाच्या उदघाटन प्रसंगी शिवसेना(उ. बा.ठा)गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यासमोरच आमदार होण्याची ईच्छा व्यक्त करत मला उमेदवारी द्याच असा आग्रह धरला त्यावर राऊतांनी सकारात्मकता दर्शवली असली तरी श्रीगोंदा तालुक्यात शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे २०१४ साली शरद पवार यांनी तालुक्यातील पाचपुते विरोधकांची मोट बांधत राहुल जगताप यांच्यासारख्या तरुण उमेदवाराला संधी देत निवडून आणले होते २०१९साली सुद्धा ऐनवेळी राष्ट्रवादी कडून निवडणूक लढलेले घनश्याम शेलार यांचा अवघ्या काही हजार मतांनी पराभव झाला होता त्यामुळे श्रीगोंद्याच्या जागेवर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रबळ दावा असणार आहे
बबनराव पाचपुते हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते निवडणूक लढवणार का?याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात असतानाच मागील काही दिवसांपासून पाचपुते यांनी पुन्हा एकदा लग्न समारंभ,व्यक्तिगत भेटीगाठी या माध्यमातून तालुक्यात आपला संपर्क वाढवला आहे अलीकडच्या काही दिवसातील त्यांची वक्तव्य पाहता पाचपुते यांनी जोरदार कमबॅक करत समोर कुणीही येऊ द्या मी परत लढायला तयार असल्याचे सुतोवाच त्यांनी दिले आहेत
त्यातच अनुराधा नागवडे या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यानीसुद्धा तालुका पिंजून काढला आहे परंतु महायुती कडून श्रीगोंद्यात सध्या तरी विद्यमान आमदार भाजपचे असल्यामुळे ही जागा भाजपला सुटेल असे चित्र आहे परंतु अनुराधा नागवडे यांनी अजित पवार गटात प्रवेश करताना त्यांना देखील उमेदवारीचा शब्द दिल्याचे त्यांचे जवळचे लोक खात्रीशीर रित्या सांगत आहेत त्यामुळे आता भाजप ही जागा राष्ट्रवादी ला सोडणार का हा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे त्यामुळे महायुतीसमोर नागवडे की पाचपुते हा तिढा सोडवण्याचे मोठे आव्हान असणार आहे
त्यातच बीआरएस ला रामराम करत काँग्रेस चा हात हातात घेतलेले घनश्याम शेलार हे सुद्धा काहीही झाले तरी निवडणूक लढवणारच यावर ठाम आहेत त्यांनी त्या दृष्टीने तालुक्यात विविध कार्यक्रम राबवत जनसंपर्क वाढवला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते साजन पाचपुते, राहुल जगताप आणि घनश्याम शेलार यांच्यापैकी कुणाला उमेदवारी देणार आणि कुणाला थांबवणार याबाबतही उत्सुकता आहे
त्यातच श्रीगोंदा तालुक्यातील ओबीसी नेते म्हणून ओळख असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी आपली ही आयुष्यातील शेवटची निवडणूक असल्याचे सांगत भावनिक साद घालत सर्व नेत्यांनी मिळून मला मदत करा माझ्या मदतीची सावड फेडा अशी याचना करत आपण यावेळी विधानसभा काहीही झाले तरी लढणारच अशी भीष्म प्रतिज्ञा करत निवडणूक रिंगनात उडी घेत अजून ट्विस्ट वाढवले आहे
सर्वच उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आमदार होण्यासाठी सज्ज असले तरी उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार कुणाला नारळ मिळणार आणि कोण अपक्ष उमेदवारी करणार हे पाहण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे
श्रीगोंद्यात दादा,आण्णा,भैय्या आणि वहिनींसह आर्धा डझन इच्छुक,इच्छुकांच्या भाऊ गर्दीत उमेदवारीची लॉटरी नेमकी कुणाला?
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ०८, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: