जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरस्थिती सह लाडक्या बहीण योजनेचा आढावा



प्रशासक न्यूज,दि.५ऑगस्ट २०२४

काल दि.४ रविवार रोजी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ हे श्रीगोंदा तालुका दौऱ्यावर आले होते त्यांनी आधी तालुक्यातील भीमा नदीकाठी असलेल्या पुराचा धोका निर्माण होऊ शकणाऱ्या आर्वी,अनगरे बेटांची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या

 यावेळी त्यांच्या सोबत तहसीलदार क्षितिजा वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्यासह प्रशाकीय अधिकारी उपस्थित होते त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीगोंद्यात तहसील कार्यालय,पंचायत समिती,नगरपरीषद या कार्यालयामध्ये जाऊन 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या कामाचा आढावा घेतला

 आतापर्यत योजनेसंदर्भात आलेले एकूण अर्ज अर्जाबाबत येणाऱ्या अडचणी याबाबत माहिती घेऊन त्या अडचणी सोडवण्याचे आदेश देऊन योजनेची प्रभावी आंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले यावेळी तहसीलदार क्षितिजा वाघमारे,गटविकास अधिकारी राणी फराटे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत या उपस्थित होत्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर लाडक्या बहीण योजनेच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा महिला व्यक्त करत आहेत
जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरस्थिती सह लाडक्या बहीण योजनेचा आढावा  जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरस्थिती सह लाडक्या बहीण योजनेचा आढावा Reviewed by Prashasak on ऑगस्ट ०५, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.