पुणे जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे धरणामधून मोठ्या प्रमाणात खाली पाणी सोडल्यामुळे भीमा नदीला मोठा पूर आला आहे आज सकाळी १० वाजता दौंड येथे भीमा नदीला १,९१,५२७कुसेक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असून त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे
एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे दौंड-नगर रस्त्यावरील निमगाव खलू येथील भीमा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे मोठ्या प्रमाणात नदीला पाणी आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्यामुळे कापूस,ऊस पिकांचे नुकसान झाले आहे
नागरिकांना सतर्कतेचा ईशारा/-तहसीलदार क्षितिजा वाघमारे
भीमा नदीला पूर आल्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे आर्वी बेट पाण्याखाली गेले आहे आर्वी,अनगरे बेटावरील लोक सुरक्षित आहेत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे
नदीचा विसर्ग वाढला,सतर्कतेचा ईशारा
Reviewed by Prashasak
on
ऑगस्ट ०५, २०२४
Rating:
