प्रशासक न्यूज,दि.९जुलै
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नगर दक्षिण शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी बाळासाहेब दुतारे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे बाळासाहेब दुतारे यांनी यापूर्वी शिवसेना शाखाप्रमुख शिवसेना उपशहर प्रमुख युवासेना उपजिल्हाप्रमुख शिवसेना तालुकाप्रमुख या पदावर काम केलं आहे कडवट निष्ठावंत शिवसैनिक म्हणून बाळासाहेब दुतारे यांची श्रीगोंदा तालुक्यामध्ये ओळख आहे
श्रीगोंदा तालुक्यातील 114 गावांमध्ये बाळासाहेब दुतारे यांनी शिवसेनेचे मजबूत संघटन उभे केले आहे गाव तेथे शाखा घर तिथे शिवसैनिक निर्माण करण्याचं काम केलं आहे या निवडीबद्दल बाळासाहेब दूतारे यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे यामध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेब शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर खासदार निलेश लंके शिवसेना उपनेते साजन पाचपुते घनश्याम आण्णा शेलार राहुल दादा जगताप बाबासाहेब भोस भगवान फुलसौंदर संदेश कारले नगरसेवक योगीराज गाडे विधानसभा संपर्कप्रमुख संजय खंडागळे यांनी अभिनंदन केले तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडीमध्ये या निवडीबद्दल आनंदच वातावरण निर्माण झाला आहे
उपजिल्हाप्रमुख पदी दुतारे यांची निवड
Reviewed by Prashasak
on
जुलै ०९, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै ०९, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: