प्रशासक न्यूज,दि.९जुलै २०२४
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अहमदनगर दक्षिण मतदार संघाचे खासदार नीलेश लंके यांना सिद्धार्थ नगर ससाणे नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी प्रयोगशाळा आणि संगणक संचासह खोली मिळणे बाबत निवेदन देण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की,सिद्धार्थ नगर ससाणे नगर येथे असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मुले मुली शिक्षण घेत आहेत.शाळेची पटसंख्या सुमारे 180 इतकी असून हे सर्व विद्यार्थी अनुसूचित या प्रवर्गातील आहेत.शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना अध्ययन - अध्यापनात प्रयोगशाळेची नितांत गरज आहे.तसेच विद्यार्थ्यांना संगणक ज्ञानप्राप्ती होण्यासाठी संगणक संचासह संगणक खोलीची आवश्यकता असल्याचे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप यांनी निवेदनात म्हंटले आहे..
तरी यावेळी निलेश लंके यांनी शाळेबद्दल विचारपूस करून निवेदन बारकाईने वाचून लवकरात लवकर दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे,जितेंद्र पाटोळे,सुभाष ससाणे,नेवासे तालुकाध्यक्ष सतीश थोरात,पारनेर तालुका कार्याध्यक्ष नितीन मुरकुटे,उपस्थित होते तर निवेदनावर रावसाहेब घोडके,आनंद घोडके,रमेश मखरे,विजय कानगुडे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत..
शाळेसाठी निवेदन,लगेच आश्वासन!सामाजिक न्याय विभागाचे उमाप यांचा पुढाकार
Reviewed by Prashasak
on
जुलै ०९, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: