प्रशासक न्यूज, दि.१४जुलै २०२४
विशाल अ चव्हाण
मला एकदा आमदार कराच या पट्ठ्यावर विश्वास ठेवा गुलाल आणून दाखवतो निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईल असा आत्मविश्वास शिवसेना उ बा ठा गटाचे उपनेते आणि काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांनी व्यक्त करत थेट संजय राऊत यांच्याकडेच विधानसभा उमेदवारीसाठी साकडे घालत विधानसभेचे रणशिंग फुंकले तसेच चाळीस वर्षे आम्हीच आमदार होतो पण तालुक्यात अजून रस्ते, वीज, पाणी प्रश्न जैसे थेच आहेत त्यामुळे तालुक्यात फिरायची सुद्धा आता मला लाज वाटते एवढे वर्षे आमदार असून नेमक काय केल असा प्रश्न पडतोय असे म्हणत त्यांनी आपले चुलते भाजप चे आमदार बबनराव पाचपुते व त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांच्यावर आक्रमक शैलीत चांगलीच तोफ डागत सडकून टीका केली
काल दि.१३ शनिवारी सायंकाळी सात वाजता साजन पाचपुते यांच्या श्रीगोंदा शहरातील बायपास रस्त्यावरील संपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले यावेळी या कार्यक्रमासाठी राणीताई लंके,वसंत मोरे,तालुकाप्रमुख विजय शेंडे, शहरप्रमुख संतोष खेतमाळीस,नगर काँग्रेस शहराध्यक्ष किरण काळे,उपप्रमुख संदेश कार्ले, माजी महापौर भगवान फुलसुंदर,संभाजी कदम,जि प सदस्य शरद झोडगे, शिवसेनेचे जेष्ठ नेते भाऊसाहेब गोरे,सरपंच ऋषिकेश शेलार,टिळक भोस उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक तालुकाप्रमुख विजय शेंडे यांनी केले वसंत मोरे, ऋषिकेश शेलार,कार्यक्रमाचे अध्यक्ष संदेश कार्ले यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी बोलताना साजन पाचपुते यांनी थेट संजय राऊत यांना साकडे घालत महाविकास आघाडीकडून विधासभा उमेदवारीची मागणी केली तसेच काष्टी गावचा मी सरपंच आहे पण स्वतःचा मुलगा पडला म्हणून मला निधी देत नाहीत गावाची अवस्था वाईट आहे असा आरोप त्यांनी आ पाचपुते यांच्यावर केला
*तर तो अधिकारी कपडे घालून उभा केला असता*
श्रीगोंदा शहरात आठ दिवस विजपुरवठा खंडित होता तेव्हा आमदार कुठं होते मला आमदार करा,मी आमदार असतो तर या असल्या अधिकाऱ्यांना कपडे काढून उभा करत जाब विचारला असता असे मत साजन पाचपुते यांनी मांडले
प्रशासनावर दबाव नाही, आमदारांना फक्त टक्केवारीची अपेक्षा
सध्या श्रीगोंदा तालुक्यातील प्रशासनावर आमदारांचा वचक नाही त्यांना फक्त टक्केवारी घेण्यात रस आहे चाळीस वर्षे लोकांनी प्रेम केल तरी त्यांना टक्केवारीची अपेक्षा आहे श्रीगोंदा पोलीस स्टेशन म्हणजे तडजोड केंद्र बनले आहे कुठला गुन्हा दाखल करायचा तर चिरीमिरी द्यावे लागते असा आरोप पाचपुते यांनी केला
*आपण एकाच गाडीत मुंबईला जाऊ..*
राणीताई तुम्ही फिक्स आमदार होणार आहेत निलेश लंके यांचं घरा घरात नाव आहे त्यामुळे राऊत साहेब मला तिकीट द्या म्हणजे मी आणि राणीताई लंके आम्ही दोघे एकाच गाडीत मुंबईला येऊ असे साजन यांनी म्हणताच एकच हशा पिकला
या उदघाट्न कार्यक्रमात बोलताना खासदार संजय राऊत यांनी साजन पाचपुते यांच्या उमेदवारीच्या मागणीला प्रतिसाद देत स्टेजवर बसलेले चार लोक आमदार होतील असे सांगतानाच तुम्हांला संपूर्ण तालुक्यात पोहोचाव लागेल असा सल्ला देखील त्यांनी साजन पाचपुते यांना दिला नगर जिल्ह्यात शिवसैनिकांना चांगले दिवस आले आहेत खा निलेश लंके हे तुतारीच्या चिन्हावर खासदार झाले असले तरी ते मुळ शिवसैनिकच आहेत असे सांगत केंद्रीय मंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले मुंबई कमजोर करण्याचा त्या दोघांचा डाव आहे मोदी हे खोटारडे पंतप्रधान आहेत असा हल्लाबोल त्यांनी चढवला
*नकली पाचपुते बाजूला करून असली पाचपुतेना आमदार करा*
श्रीगोंद्यात आ बबनराव पाचपुते एवढे वर्षे आमदार होते,मंत्री होते तरी कुकडीचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाहीत विकासकामे झालेली नाहीत बबनराव पाचपुते हे नकली पाचपुते असून त्यांना बाजूला करून आता खरे पाचपुते साजन यांना आमदार करा असे संजय राऊत म्हणाले
*तुम्ही कोणत्या भाषेत शपथ घेणार*
खा निलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजी भाषेत शपथ घेत ज्यांनी त्यांना आव्हान दिले होते त्यांना चपराक लगावली तेव्हापासून ते महाशय कुठे दिसत नाहीत असे म्हणत माजी खा सुजय विखे ना त्यांनी चिमटा घेतला तसेच निलेश लंकेनी इंग्रजीत शपथ घेतली आती राणीताई तुम्ही विधानसभेत कोणत्या भाषेत शपथ घेणार असे त्यांनी विचारले त्यावर चांगल्याच टाळ्या वाजल्या
*शेतमालाला भाव नसून तो भावा फक्त विकल्या जाणाऱ्यांना*
शेतीमालला, दुधाला भाव नाही तो भावा फक्त ५०कोटी रुपयांना विकल्या जाणाऱ्या आमदारांना गद्दारांना असून विधापरिषद निवडणुकीत २५कोटी रुपयांना महायुतीने आमदारांची मते विकत घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला
मला एकदा आमदार कराच!.. आणी म्हणून तालुक्यात फिरताना लाज वाटते,साजन पाचपुते आक्रमक मोडमध्ये
Reviewed by Prashasak
on
जुलै १३, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: