श्रीगोंद्यात पुन्हा ऱ्हाडा,दोन तरुण गंभीर जखमी

(पोलीस स्टेशनच्या आवारात जमलेली गर्दी)

प्रशासक न्यूज,दि.१२जुलै

श्रीगोंदा शहरात सध्या कायद्याचा धाक अजिबात उरला नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे दोन दिवसांपूर्वीच महाविद्यालयात एका मुलाचा दुसऱ्या मुलालाा धक्का लागल्यामुळे महाविद्यालयासमोरच दोन गटात जबर मारहाण झाली होती यात एका गटाकडे दुचाकीचे रॉड तर दुसऱ्या गटातील तरुणाकडे मोठा चाकू असल्याची माहिती समजते दिवसा झालेल्या या जबर मारहाणीमुळे दहशतीचे वातावरण पसरले होते त्यावेळी दोन्ही बाजूकडून कोणतीही तक्रार दाखल न करता ते प्रकरण आपसात मिटवण्यात आले 

त्यानंतर आज दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर दुचाकीला धक्का लागल्याच्या अगदी क्षुल्लक कारणातून श्रीगोंदा कारखाण्यावरील तरुण व शहरातील तरुण यांच्यात तुफान हाणामारी झाली यात दोन्ही तरुण गंभीर झखमी झाले आहेत एका च्या पाठीवर,हातावर, पोटावर गंभीर दुखापत झाली असून दुसऱ्या तरुणाच्या डोक्याला मार लागला आहे भरदिवसा एवढ्या किरकोळ कारणातून दोन्ही तरुणांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला केला या घटनेने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस तिथे पोहोचले पण पोलीस आल्यावर सुद्धा ना जमाव पांगला ना मारहाण करणाऱ्या तरुणांनी एकमेकांना सोडले पोलिसांसमोर या दोन्ही तरुणांची धरपकड चालू होती त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले
जखमी तरुणांनवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत

*पोलिसांची फक्त बघ्याची भूमिका*
महाविद्यालयाच्या आवारात या वादानंतर मोठी गर्दी जमली होती परंतु पोलीस आल्यावर सुद्धा गर्दी जैसे थेच होती यावेळी पोलिसांनी कोणतीही ऍक्शन न घेता बघ्याची भूमिका पार पाडल्याचा आरोप उपस्थित लोकांनी केला आहे

*पोलीस स्टेशनला मोठा जमाव*
या दोन्ही तरुणांना पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही बाजूकडून मोठा जमाव जमला होता पोलिसांनी काहीवेळाने हा जमाव पांगवला सध्या श्रीगोंद्यात तणावपूर्ण शांतता आहे 
श्रीगोंद्यात पुन्हा ऱ्हाडा,दोन तरुण गंभीर जखमी श्रीगोंद्यात पुन्हा ऱ्हाडा,दोन तरुण गंभीर जखमी Reviewed by Prashasak on जुलै १२, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.