बंदुकीचा धाक दाखवून सदस्याचे अपहरण, सरपंचा विरोधात गुन्हा दाखल!


प्रशासक न्यूज,दि.१०जुलै २०२४

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शिवप्रसाद उर्फ बंटी भाऊसाहेब उबाळे व उपसरपंच अनुराधा अनिल ठवाळ यांच्या विरोधात दि.५जुलै रोजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम राऊत यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता त्याचा फैसला आज दि.१० रोजी होणार होता परंतु त्या आधी काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य नितीन बन्सी गव्हाणे यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांचे अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना कर्जत तालुक्यातील माहिजळगाव बायपास बसस्टॅण्ड नजीक घडली असून सदर घटनेबाबत दीपक दादाराम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्यासह सहा अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

राऊत यांनी दिलेल्या फिर्यादित म्हंटले आहे की काल सदर ठिकाणी वेळी ते इतर ग्रामपंचायत सदस्यांसह सांगोल्याहून परत येत असताना माहिजळगाव बायपास याठिकाणी ते पाण्याची बाटली घेण्यासाठी एका टपरीवर थांबले तेव्हा एक चॉकलेटी रंगाची वेरना कार व एक काळ्या रंगाची क्रियेटा कार अश्या दोन गाडीतून आलेल्या अज्ञात इस्मानी नितीन गव्हाणे यांना मारहाण करत त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांना घेऊन गेले यावेळी त्या कार मध्ये सरपंच शिवप्रसाद उबाळे हे बसलेले होते जाताना या इस्मानी आमच्या नादी लागायचे नाही असे म्हणत दमदाटी केली

यानंतर राऊत यांच्या कारची चावी या लोकांनी काढून नेली त्यानंतर राऊत यांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली पोलिसांनी अपहरण झालेल्या नितीन गव्हाणे यांचा शोध घेतला पण ते मिळून आले नाहीत कर्जत पोलीस पुढील तपास करत आहेत

अविश्वास ठरावाच्या एक दिवस आधीच अश्या प्रकारे ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे
बंदुकीचा धाक दाखवून सदस्याचे अपहरण, सरपंचा विरोधात गुन्हा दाखल! बंदुकीचा धाक दाखवून सदस्याचे अपहरण, सरपंचा विरोधात गुन्हा दाखल! Reviewed by Prashasak on जुलै ०९, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.