विशाल अ चव्हाण
प्रशासक न्यूज,दि.४जुलै २०२४
श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संपूर्ण तालुक्याचे श्रद्धास्थान आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून संपूर्ण राज्यभरात नावलौकिक असलेल्या संत शेख महंमद महाराज पालखीचे आज मोठ्या भक्तीमय वातावरणात ज्ञानोबा माऊली तुकारामा च्या जयघोषात,बँड च्या तालावर,टाळ मृदूंगाच्या ठेक्यावर नाचत, भजन करत मोठ्या उत्साहात पंढपूरकडे प्रस्थान झाले
शेख महंमद महाराज की जय च्या घोषणेने सर्व शहर दुमदुमून गेले होते पालखी सोहळ्याचे हे दुसरे वर्षे आहे एकूण दोन हजार भाविकांनी दिंडीत सहभागासाठी नावनोंदणी केलेली आहे यासर्वांचा दिंडी सोहळा समिती तर्फे विमा उतरवण्यात आलेला आहे
आज सकाळी अकरा वाजता शेख महंमद महाराज मंदिर परिसरातून फुलांनी सजावट केलेल्या आकर्षक रथातून पालखीचे प्रस्थान झाले शहरात ठिकठिकाणी व्यापारी व्यावसायिक नागरिकांनी पालखीच्या स्वागतासाठी दारात,रस्त्यावर मोठंमोठ्या सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या शहरात ठिकठिकाणी या पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली
पालखी सोहळ्याच्या सुरुवातीला वारकऱ्यांच्या वेशातील गळ्यात टाळ कपाळी टिळा लावलेले मुलं,डोक्यावर तुळस घेतलेल्या लहान मुली हे बालवारकरी त्यांच्या मागे सजावट केलेला महाराजांचा आश्व आणि आकर्षक फुलांची सजावट असलेला रथ त्याच्या समोर पुरुष वारकरी रथाच्या मागे विठू रायाचा जयघोष करणाऱ्या मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला वारकरी रथाच्या पुढे दोन बँड त्यावर लावलेली विठ्ठलाची गाणी माऊलीचा जयघोष यामुळे आज श्रीगोंदा शहरातील वातावरण भक्तीमय विठ्ठलमय झाले होते दिंडीचे दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते शहरातील काळकाई चौकात तरुण मुलांनी दिंडीतील वारकऱ्यांसाठी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले दिंडी साठी दरदिवशी अनेक अन्नदात्यांनी नाष्टा व जेवणाचे सहकार्य केलेले आहे
शेख महंमद महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या काळातील समकालीन सुफी संत होते मागच्या वर्षीचं या दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सेवा मोफत देण्यात येतात यात नाष्टा दोन वेळ चे जेवण राहण्याची सोय तसेच आरोग्य सेवा देखील पुरवली जाते
*दिंडीतील आकर्षक रथ आणि लक्षवेधी बैलजोडी*
चालुवर्षी दिंडी सोहळ्यासाठी वेगवेगळ्या देणगीदाराच्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने जवळपास अकरा लाख रुपये खर्च करून आकर्षक रथ बनवण्यात आलेला आहे या रथात सिसिटीव्ही कॅमेरॅसह लाईटिंग,इन्व्हर्टर सुविधा देण्यात आली आहे रथ ओढतांना बैलांच्या मानेवर जास्त वजन पडू नये याची दक्षता घेण्यात आली असून जु मध्ये स्प्रिंग बसवण्यात आली आहे रथाला हॅन्ड ब्रेक सह पायातील ब्रेक बसवण्यात आला आहे श्रीगोंदा शहरातील सूरज इंजिनिअरिंग चे नानासाहेब शिंदे व त्यांचा मुलगा सूरज शिंदे यांनी श्रीगोंद्यातच हा अत्याधुनिक रथ बनवला आहे
आकर्षक रथाप्रमाणेच हा रथ ओढण्यासाठी जी बैलजोडी आहे ती देखील तेवढीच आकर्षक आहे जवळपास दहा ते बारा लाख रुपयांची ही बैलजोडी आहे
दिंडीचा पहिला मुक्काम आज श्रीगोंद्यातील साळवण देवी मंदिरात असणार आहे दिंडीत महिला भाविकांचा मोठा सहभाग आहे
संत शेख महंमद महाराज निघाले विठ्ठलाच्या भेटीला!
Reviewed by Prashasak
on
जुलै ०४, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
जुलै ०४, २०२४
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: