प्रशासक न्यूज,दि.२८जून
अलीकडे मुलांचे लग्न जमण्यात मोठ्या अडचणी येत आहेत मुलांपेक्षा मुलींचा कमी असलेला जन्मदर, मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे वय होऊनसुद्धा अनेक तरुणाचे लग्न जमत नाहीत त्यामुळे लग्न रखडलेल्या मुलाचे घरचे आता लग्न जमवण्यासाठी एजन्ट लोकांची मदत घेत आहेत
लाखो रुपये रक्कम मोजून नवरी मुलगी शोधली जातं आहे मध्यस्थी करणाऱ्या एजंटची यात चांदी होत आहे परंतु पैसे देऊन पण लग्न झाल्यानंतर या मुली पळून जात आहेत त्यात अनेक जणांची आर्थिक फसवणूक होत आहे अशीच घटना आज दुपारी श्रीगोंदा न्यायालयासमोर घडली
श्रीगोंदा तालुक्यातील मुंगसगाव येथील एका तरुणाचे एका एजंटला साडेचार लाख रुपये देऊन तीन दिवसांपूर्वीच एका मंदिरात साध्या पद्धतीने लग्न झाले त्यानंतर देवदेव झाले पण दोन्ही कडच्या मंडळींना अडचण नको म्हणून नवरी आणि नवरदेव यांच्या कुटुंबंयांनी या लग्नाची वकीलामार्फत नोटरी करून घेण्याचे ठरवले यासाठी नवीन लग्न झालेली नवरी तिची आई आणि नवरदेव आणि त्यांचे घरचे आज दुपारी श्रीगोंद्यात आले नोटरी करण्यासाठी मुलाचे वडील आणि मुलगा वकीलाच्या कार्यालयात गेले असता नवरी आणि तिची आई आम्ही जरा जाऊन येतो असे नवरदेवाच्या आईला म्हणले त्यानंतर त्या दोघी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनात जाऊन बसल्या संशय आल्यामुळे मुलाची आई गाडीजवळ गेली गाडी सुरु होऊन नवरी पळून जातानाच मुलाच्या आईने तिच्या केसाला धरून गाडीबाहेर ओढले त्याचवेळी गाडीत बसलेल्या मुलीच्या आईने आपल्या बॅग मधील मिरची पावडर काढून मुलाच्या आईच्या डोळ्यात टाकली आरडाओरडा झाल्यामुळे लोक त्याठिकाणी जमले गाडीसह गाडीतील दोन जणांना लोकांनी पकडले एकजण पळून गेला
एवढी मोठी रक्कम देऊनसुद्धा फसवणूक झाल्यामुळे मुलाच्या घरच्यांनी संताप व्यक्त केला मुलाच्या आईने प्रसंगावधान राखत मुलीला गाडीतून ओढल्यामुळे तिचा पळून जाण्याचा डाव फसला सदर रकमेतील आडीच लाख रुपये मुलीच्या आईला देण्यात आले होते तसेच मुलीची आई सुद्धा बनावट असल्याचा संशय मुलाच्या घरच्यांनी व्यक्त केला
पोलीसांनी तात्काळ त्याठिकाणी जाऊन आरोपीना ताब्यात घेतले सर्वांना पोलीस स्टेशनला नेले रात्री उशिरा या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते
मुलीकडे वेगवेगळ्या नावाचे दहा आधारकार्ड सापडले असून ही मुलगी यवतमाळ जिल्ह्यातील असून या आधी तिचे पाच ते सहा लग्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे
मुलीकडे वेगवेगळ्या नावाचे दहा आधारकार्ड सापडले असून ही मुलगी यवतमाळ जिल्ह्यातील असून या आधी तिचे पाच ते सहा लग्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे
ऐन गर्दीच्या वेळीच मिरची पूड डोळ्यात टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्यामुळे न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला होता
मिरची पूड टाकून मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न,श्रीगोंद्यातील प्रकार!
Reviewed by Prashasak
on
जून २८, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: