टवाळखोर तरुणांचा एसटीवर हल्ला!



प्रशासक न्यूज,दि.२६जून

एसटी मधून खाली उतर म्हणल्याचा राग आल्यामुळे चार ते पाच टवाळखोर तरुणांनी प्रवाश्यांनी भरलेल्या एसटी वर हल्ला करत दगडफेक करत एसटी च्या काचा फोडल्या लाकडी दांडक्याने एसटी च्या दारावर मारत एसटीच्या चालक वाहकाला धमकावल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावात आज दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे

प्रवाश्यानी भरलेल्या एसटीवर अचानक अशी दगडफेक झाल्यामुळे प्रवाशी घाबरले होते सुदैवाने यात कुणाला इजा झाली नाही सदर घटनेबाबात रात्री उशिरा तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते

या घटनेबाबत एसटी चालक वाहक यांच्या कडून समजलेली माहिती अशी की आज श्रीगोंदा डेपोची श्रीगोंदा स्वारगेट एसटी पुण्यावरून श्रीगोंद्याकडे येत असताना वरवंड या ठिकाणी एसटी मध्ये महाविद्यालयीन तरुणी चढल्या त्यांच्या मागे काही तरुण चढले यावेळी एक तरुण दरवाजात उभा होता त्याला एसटी वाहकाने दरवाज्यातून पुढे हो असे सांगितले त्यावरून वाहक व त्या तरुणात शाब्दिक बाचाबाची झाली त्यावेळी एसटी च्या चालकांनी वाद वाढायला नको म्हणून सदर तरुणाला खाली उतर मागच्या एसटीने ये असे सांगितले त्यानंतर तो तरुण खाली उतरला परंतु एसटी जेव्हा काष्टी याठिकाणी आली तेव्हा तो तरुण त्याच्या चार साथीदारांसह दोन दुचाकीवर एसटीचा पाठलाग करत आले काष्टी याठिकाणी श्रीगोंदा चौकात ही एसटी थांबली असता हातात हॉकी स्टिक घेऊन आलेल्या तरुणांनी अचानक एसटीवर हल्ला चढवला एसटीचा दरवाजा उघडण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांना दरवाजा उघडला नाही त्यानंतर त्यांनी चालकाच्या दरवाज्यावर हॉकी स्टिकने मारत दरवाजा उघडण्यास सांगितले परंतु चालकाने दरवाजा न उघडल्यामुळे या तरुणांनी एसटी च्या समोरच्या बाजूने दगडफेक केली यात एसटीचे मोठे नुकसान झाले यावेळी एसटीत महिला प्रवासी देखील होत्या सुदैवाने हा दगड कुठल्या प्रवाश्याला लागला नाही दगडफेक करून या तरुणांनी तिथून पळ काढला

खाली उतर सांगितल्याच्या किरकोळ कारणाचा राग येऊन या टवाळखोर तरुणांनी एवढ्या लांब एसटीचा पाठलाग करून येत दक्षिणात्य सिनेमाला लाजवले असा धाडसी हल्ला केल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे

श्रीगोंदा एसटी आगाराचे व्यवस्थापक कर्मचारी यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली त्यानंतर उशिरा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते

प्रवाश्यानी भरलेल्या एसटीवर भरदिवसा भरचौकात असा हल्ला करण्याची हिंमत या तरुणानमध्ये येते कुठून असा प्रश्न आता उपस्थित होत असून टवाळखोर हल्लेखोरांनावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे
टवाळखोर तरुणांचा एसटीवर हल्ला! टवाळखोर तरुणांचा एसटीवर हल्ला! Reviewed by Prashasak on जून २६, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.