प्रशासक न्यूज,दि.२५जून
श्रीगोंदा शहरातील शिवाजीनगर येथे आज पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास पाच चोरट्यानीं चांगलाच धुमाकूळ घातला शिवाजीनगर सारख्या राहिवाश्यानी गजबजलेल्या मध्यवस्तीती चोरट्यानीं सेवानिवृत्त अधिकारी रामचंद्र पवार यांच्या बंगल्याची खिडकी तोडून घरात प्रवेश करत घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समजली आहे
पवार यांचे कुटुंबीय बाहेरगावी राहतात त्यांचा बंगला बंद असतो परंतु नातेवाईकांचे लग्न असल्यामुळे दोन दिवस आधीच या बंगल्यात सोन्याचे दागिने आणून ठेवल्याची माहिती मिळत आहे चोरट्यानी आधी घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो तुटला नाही त्यामुळे त्यांनी खिडकीचे गज कापून खिडकीतून बंगल्यात प्रवेश करून मुद्देमाल चोरून नेला
यानंतर शिवाजीनगर परिसरात राहणारे काही नागरिक जागे झाले त्यातील काही सजग नागरिकांनी चोरट्याना हटकले असता चोरट्यानीं गिलवरीने त्यांच्या दिशेने दगडफेक केली सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही त्यानंतर चोरट्यानीं जाताना अनेक लोकांच्या घराच्या गेटवर टनक वस्तूने मारत गोंधळ करत तिथून पळ काढला
पोलिसांना माहिती समजल्यानंतर पोलीस त्याठिकाणी गेले परंतु चोरटे काष्टीच्या दिशेने पसार झाले होते परिसरातील नागरिकांकडून समजलेल्या माहितीनुसार चोरटे टू व्हिलर वर आले होते तोंडाला रुमाल बांधलेले पाच जण होते सीसीटीव्ही मध्ये हे चोरटे कैद झाले आहेत
आज सकाळी श्वानपथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले चोरट्यानीं भरवस्तीत असा गोंधळ घालत नागरिकांच्या दिशेने दगडफेक केल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे
मध्यवस्तीत चोरट्याचा धुमाकूळ,दगडफेक करत दहशत!
Reviewed by Prashasak
on
जून २५, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: