त्या घटनेबाबत गुन्हा दाखल!


प्रशासक न्यूज, दि.१६जून

विहिरीचे काम सुरु असताना जिलेटीनच्या कांड्यांचा स्फ़ोट होऊन त्यात विहिरीत काम करणारे सुरज ऊर्फ नासीर युसुफ इनामदार, वय- 25, वर्ष, गणेश नामदेव वाळुंज, 25 वर्षे दोन्ही रा. टाकळीकडेवळीत ता.श्रीगोंदा
नागनाथ भालचंद्र गावडे,वय- 29 वर्षे रा.बारडगाव ता.कर्जत हे तिघे मजूर मृत्युमुखी पडले तर जब्बार सुलेमान इनामदार हा मजूर गंभीर जखमी झाला होता तर विहिरीच्या बाहेर उभे असलेले विहीर मालक वामन गेणा रणसिंग,व त्यांचा सहकारी रवींद्र गणपत खामकर हे या स्फ़ोटात जखमी झाले होते सदर घटना काल दि. १५रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत या गावात वामन रनसिंग यांच्या विहिरीत घडली होती
या दुर्घटनेबाबत मलंग बशीर शेख रा दुरगाव यांच्या फिर्यादीवरून आज या तीन मजुरांच्या मृत्यूस व इतरांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत असलेल्या संजय श्यामराव इथापे यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

फिर्यादित म्हंटले आहे रणसिंग यांच्या काम सुरु असलेल्या विहिरीत मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपलब्ध नसताना व ब्लास्टिंग करणारे प्रशिक्षित डीलर(फायरर)उपलब्ध नसताना,तसेच स्फ़ोटक पदार्थ वापरण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना तसेच स्फ़ोटक पदार्थांचे काम धोकेदायक आहे त्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे माहित असताना सुद्धा संजय इथापे यांनी या मजुरांना विहिरीत उतरवून ब्लास्टिंगच्या जिलेटिन कांड्या भरण्यासाठी प्रवृत्त केले त्यानुसार त्यांच्या सांगण्यावरून या मजुरांनी विहिरीत होल करून ब्लास्टिंगच्या जिलेटिन कांड्या होलमध्ये भरण्याचे काम सुरु असतानाच विहिरीत स्फ़ोट होऊन स्फ़ोटाच्या दणक्याने हे कामगार विहिरी बाहेर फेकले गेले त्यात तीन मजुरांचा मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे
सदर दुर्घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

त्या घटनेबाबत गुन्हा दाखल! त्या घटनेबाबत गुन्हा दाखल! Reviewed by Prashasak on जून १६, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.