प्रशासक न्यूज,दि.१५जून २०२४
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत या गावात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून यात तिन कामगारांचा मृत्यू झाला असून १जण गंभीर जखमी झाला आहे तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत मयता पैकी एक जण बारडगाव येथील तर दोघे जण टाकळी गावातील असल्याची माहिती समोर येत आहे
घटनेबाबत प्राथमिक समजलेली माहिती अशी की श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत या गावात एका विहिरीचे काम चालू होते त्यासाठी विहिरीत जिलिटिनच्या कांड्या लावण्यात आल्या होत्या त्यावेळी विहिरीत चार कामगार होते ते विहिरीच्या बाहेर येण्याच्या आतच या जिलिटीन कांड्यांचा स्फ़ोट झाला त्यात विहिरीत असणारे चार कामगार विहिरी बाहेर फेकले गेले यात तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरु आहेत
तर विहिरीच्या बाहेर उभे असलेले दोघे जण यात किरकोळ जखमी झाले आहेत या दुर्दैवी घटनेमुळे टाकळी गावावर शोककळा पसरली आहे
दुर्दैवी घटना तीन जणांचा मृत्यू,श्रीगोंदा तालुक्यातील घटना!
Reviewed by Prashasak
on
जून १५, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: