भीक मागून पैसे दिले,आतातरी सुधारणा होईल का?


प्र
शासक न्यूज,दि.१०जून२०२४

श्रीगोंदा शहर व तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू असून या दिवसात लाईट येत नाही. त्यामूळे उद्योजक व्यापारी नागरिक अतिशय हैराण झालेआहेत. तसेच याबाबत दि. 20 मे 2024 रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले होते.
त्यावेळी एस. डी. ओ. श्रीगोंदा यांच्या वतीने 31 मे पूर्वी सर्व मेंटेनस ची कामे करून तथा खाजगी ठेकेदार नियुक्त करून एस.डी.ओ. श्रीगोंदा यांच्या मागील मागणी प्रमाणे 8 AB स्विच, आठ किलोमीटर अंतर्गत लाइन, असे अनेक प्रलंबित कामे, मान्सून पूर्व दुरुस्ती ची कामे करण्यात येतील. असे लेखी आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. परंतु त्या लेखी आश्वासनाच्या पत्राद्वारे अद्याप एकही मागणी पूर्ण होत नसून याउलट सद्यपरिस्थितीत 20 –22 तास लाईट जात असून अनेक व्यापारी, नागरिक हैराण झाले आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा, येथे पेशंट वर उपचार करणे शक्य होत नाही.

पोलिस स्टेशन, दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील, पंचायत समिति, भूमिअभिलेख, वरिष्ठ स्तर न्यायालय येथे अनेक नागरिकांची कामे विजेअभावी रखडली आहेत तसेच दि. 28 मे 2024 कंत्राटी कर्मचारी यांच्या थकीत वेतन संदर्भात 6 जून रोजी आंदोलन करण्याचे पत्र देण्यात आले होते.परंतु त्याही वेळी लेखी आश्वासना मुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
तरी उपरोक्त सर्व बाबींचे अवलोकन केल्यास महावितरण कंपनीचा गलथान कारभार जाणवत आहे. तसेच उपरोक्त सर्व कामे निधी अभावी करणे शक्य होत नाहीत. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याने आज वैतागून नागरिकांनी आंदोलन केले.

कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार नाही
तसेच श्रीगोंदा शहरातील जुनी लाईन दुरुस्त करण्यासाठी
अजूनही साहित्य पुरवठा आला नाही.
अशा अनेक तक्रारी आहेत.
नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहेत.
या आंदोलनाबाबत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी सांगितले की वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता खांडेकर यांना आपण
चार वेळा भेटलो आहे.
तसेच कार्यकारी अभियंता माळी यांना सुद्धा अनेक वेळा
सांगून सुद्धा त्यांच्या कामात फरक पडत नाही.

त्यामुळे आज श्रीगोंदा शहरात वीज मंडळाच्या गलथान कारभारा विरोधात भीक मागो आंदोलन करण्यात आले
यात अनेक नागरिक व्यापारी शेतकरी विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यात
सतीश बोरुडे,राजू गोरे(उपनगराध्यक्ष),ऋषिकेश गायकवाड,विशाल सकट, राम घोडके,गणेश काळे,युवराज पळसकर,
वसीम शेख,वसीम ताडे,पांडुरंग पोटे आदी सहभागी झाले होते
शहराचा विविध भाग तसेच महावितरण कार्यालय परिसर अशी भीक मागण्यात आली.

३५७० रुपये जमा करून
त्यातील १० टक्के रक्कम
खांडेकर अधीक्षक अभियंता ३५७ रु
माळी कार्यकारी अभियंता ३५७ रुपये
व लोकप्रतिनिधी साठी १० टक्के रक्कम ३५७ रुपये अशी रक्कम विजमंडळाचे
अभियंता सुर्यवंशी यांच्याकडे देण्यात आली

(चौकट)
श्रीगोंदा शहरात आजचे भीक मांगो आंदोलन प्रातिनिधिक स्वरूपात केले असून भीक घेतल्यामुळे तरी अधिकारी सुधारतील अशी अपेक्षा आहे.आता आमचा संयम संपला आहे.
वीज प्रश्न न सुटल्यास अधिकाऱ्यांना खुर्चीवर बांधून कोंडून ठेवणार आहे.
त्यावेळी मात्र कायदा हातात घेऊन कुणाचीही तरी हयगय ठेवली जाणार नाही.
टिळक भोस


चौकट
श्रीगोंदा शहरात विजेचा खेळखंडोबा मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे.त्यात सुधारणा व्हायला तयार नाही.त्यामुळे आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे.
अधिकाऱ्यांना वठणीवर आणू.
सतीश बोरुडे


भीक मागून पैसे दिले,आतातरी सुधारणा होईल का? भीक मागून पैसे दिले,आतातरी सुधारणा होईल का? Reviewed by Prashasak on जून १०, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.