'त्या' प्रकरणी अखेर गुन्हा दाखल!


प्रशासक न्यूज,दि.८जून २०२४

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा अनुदानात१,८८,४७,५२४ रुपये भ्रष्टाचार झाला असल्याचे सिद्ध झाल्याने अखेर सचिव दिलीप डेबरे यांच्यासह १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत टिळक भोस
यांच्या तक्रारीवरून ही चौकशी लावण्यात आली होती
जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र निकम यांनी याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फिर्यादी दिली असून सचिव दिलीप डेबरे यांच्या सह१६ जणांवर ४२०,४६५,४६७,४६८,४७१, ४७७(अ)३५ कलमद्वारे गुन्ह्यांची झाली नोंद.

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सचिव दिलीप डेबरे यांनी संगनमताने कांदा व्यापारी व काही शेतकरी यांना हाताशी धरून कांदा अनुदान घोटाळा केला असल्याची तक्रार टिळक भोस यांनी
दिनांक ०८ /०८/२०२३ रोजी दिली होती.त्या तक्रारीची दखल घेत
जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी राजेंद्र निकम
(जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 )
यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.
त्यावर त्यांच्या विशेष पथकाने श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती मद्ये येऊन कागदपत्रे तपासणी केली असता त्यात अनेक गंभीर बाबी समोर आल्या होत्या.
संशयित ४९५ शेतकऱ्यांचे प्रस्ताव तपासणी केली असता त्यापैकी जवळपास ३०२ शेतकरी यांचे प्रस्ताव पूर्णतः बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे.

हवलदार ट्रेडिंग
207 शेतकरी
कांदा वजन 38628 क्विंटल
अनुदान रक्कम
1 35 20,118

सत्यम ट्रेडिंग कंपनी
40 शेतकरी
कांदा वजन 5438 क्विंटल
अनुदान रक्कम
19 03443

राज ट्रेडिंग कंपनी
5 शेतकरी
698.45 क्विंटल
244457 रक्कम

शितोळे ट्रेडिंग कंपनी
23 शेतकरी
4314 क्विंटल
1510166 रुपये

मोरया ट्रेडिंग कंपनी
शेतकरी 1
105 क्विंटल
रक्कम
37047

हिंदराज ट्रेडिंग कंपनी
24 शेतकरी
4353 क्विंटल
रक्कम 15 23 777 रुपये

राजलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी
2 शेतकरी
310 क्विंटल
1 08514 रुपये

एकूण शेतकरी संख्या 302
एकूण वजन 53850.07 क्विंटल
1 88 47524 रुपये
(एक कोटी अठ्ठ्यांशी लाख सत्ते चाळीस हजार पाचशे चोवीस रुपये)

येवढ्या मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार कांदा अनुदानात झाला आहे.
ही बाब चौकशीत सिद्ध झालेली असून,या घोटाळ्यामध्ये सचिव प्रत्यक्ष सहभागी आहेत.

या तपासणी मद्ये सादर केलेल्या रेकॉर्ड नुसार ऑनलाईन सात बारा उताऱ्यांची तपासणी केली असता
कांदा पिकांची नोंद आढळलेली नाही.
तसेच मापाडी रजिस्टर नुसार फेब्रुवारी मार्च २०२३ मद्ये एकूण कांदा खरेदी ८८६०८ क्विंटल आहे.मात्र डेबरे यांनी १२३३१२ क्विंटल असे वाढीव ३५००३ क्विंटल बोगस खरेदी दाखवली आहे.
यासाठी बोगस काटा पट्टी,बोगस
रेकॉर्ड बनवले आहे.

बाजार समिती सचिव यांनी पनन मंडळास चुकीची दैंनदिन कांदा आवक माहिती दिली. व त्याद्वारे जो कांदा मार्केट मध्ये आलाच नाही असे त्याचे खोटे रेकॉर्ड तयार केले गेले.त्यासाठी दिवाणजी व कर्मचारी महेश मडके यांच्या माध्यमातून खोटे रेकॉर्ड तयार केले आहे.
या सर्व बाबींचा पुराव्यासह खुलासा
(जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ )श्री.राजेंद्र निकम यांनी केला असून त्यांनी
गणेश पुरी
सहकारी संस्था. अहमदनगर यांना अहवाल सादर केला आहे.
या अहवालावर गणेश पुरी यांनी
सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा यांना
सचिव दिलीप डेबरे व दोषी इतर यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यावर आज दिनांक ८ जून २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून

फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या आरोपीचे नावे -
1) सचिव श्री. दिलीप लक्ष्मण डेबरे रा.वेळु ता.श्रीगोंदा जि.अ.नगर
2)आडते/व्यापारी हवालदार ट्रेडींग कंपनी व त्यांचे दिवाणजी
3)श्री.महादेव लोखंडे रा.चिंभळे ता.श्रीगोंदा जि.अ.नगर 4)सत्यम ट्रेडर्स़ श्रीगोंदा
5) राज ट्रेडर्स,श्रीगोंदा
6)मापाडी श्री घनश्याम प्रकाश चव्हाण,रा.श्रीगोंदा 7)श्री. शरद झुंबर होले,रा.होलेवस्ती श्रीगोंदा ता.श्रीगोंदा 8)श्री. संदीप श्रीरंग शिंदे,रा.आढळगाव ता.श्रीगोंदा 9)श्री. राजू भानुदास सातव,रा.श्रीगोंदा ता.श्रीगोंदा 10)श्री. सोपान नारायण सिदनकर,रा.श्रीगोंदा ता.श्रीगोंदा
11)श्री.दत्तात्रय किसन राऊत रा.शेडगाव ता.श्रीगोंदा 12) श्री. सिदनकर झुंबर किसन,रा.श्रीगोंदा ता.श्रीगोंदा 13)श्री. शेंडगे संतोष दिलीप रा.श्रीगोंदा ता.श्रीगोंदा 14)श्री.भाऊ मारुती कोथिंबीरे रा.साळवण देवी रोड श्रीगोंदा
15) श्री.महेश सुरेश मडके रा.लोणीव्यंकनाथ,मडकेवाडी ता.श्रीगोंदा
16) श्री.परशुराम गोविंद सोनवणे रा.टाकळी कडेवळीत ता.श्रीगोंदा.

पुढील तपास स.पो.नि.प्रभाकर निकम हे करत आहेत.

*चौकट*
कांदा अनुदान घोटाळा हा व्यापक असून सचिव दिलीप डेबरे हे त्याचे खरे सुत्रधार आहेत/-टिळक भोस

दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२३ रोजी श्रीगोंदा बाजार समिती मद्ये
६ लाख ६० हजार कांदा गोनी आवक झाली अशी माहिती मिळाली त्यावर चौकशी केली असता १३७० ट्रक कांदा दोन दिवसात मार्केट ला येऊच शकत नाही. ही गोष्ट खोलात जाऊन तपासली असता मोठा भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात आले.त्यावर तक्रार देऊन चौकशी लावली होती.
त्यात जवळपास १,८८,४७,५२४ रुपये (एक कोटी अठ्यांशी लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चोवीस)
रुपये भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे.
अजून खोलात जाऊन तपास केल्यास अनेक शेतकरी सुद्धा या प्रकरणात सापडले आहेत.
शेतकऱ्यांनी हे बोगस अनुदान घेऊ नये यासाठी आपण त्यांना आवाहन केले होते मात्र त्यांनी सचिव डेबरे यांचे ऐकून बोगस अनुदान घेतले आहे.त्यांनी ते अनुदान परत करावे अन्यथा ते २५० ते ३०० शेतकरी सुध्दा या गुन्ह्यात आरोपी होतील.

तसेच त्री सदस्यीय समिती मध्ये
*ऑडिटर महेंद्र घोडके*
(तालुका लेखा परीक्षक)
तत्कालीन प्रशासक
तथा सहाय्यक निबंधक श्रीगोंदा
*अभिमान थोरात*
हे सुध्दा दोषी आहेत.
या सर्वांवर तत्काळ गुन्हे दाखल व्हावेत यासाठी लवकरच आंदोलन करणार आहे.


'त्या' प्रकरणी अखेर गुन्हा दाखल! 'त्या' प्रकरणी अखेर गुन्हा दाखल! Reviewed by Prashasak on जून ०८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.