माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला,श्रीगोंदा तालुक्यातील घटना!



प्रशासक न्यूज,दि.६जून २०२४

आर्थिक व्यवहारातून झालेला वाद सोडवण्यासाठी मध्ये पडल्याच्या किरकोळ कारणातून श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गावचे ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच शिवाजी ज्ञानदेव चोरमले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना दि. ४जून रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास काष्टी येथील लोकसेवा हॉटेल याठिकाणी घडली असून या जीवघेण्या हल्ल्यात चोरमले यांच्यासह त्यांचे सहकारी महेंद्र महारनोर व विलास रामभाऊ उबाळे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत हे सर्व श्रीगोंदा व दौंड या ठिकाणी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत 
चोरमले यांच्या सोबत असलेल्या इतर चार ते पाच मित्रांना देखील हल्लेखोरांनी लोखंडी कोयता,चाकू,टिकाव,लाकडी दांडक्यानी जबर मारहाण करून जखमी केले आहे

सदर जीवघेणा हल्ला व जबर मारहाण प्रकरणी शिवाजी चोरमले वय ४२,रा वांगदरी यांनी श्रीगोंदा पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सूत्रधार शिंदे रा शिरसगाव काटा,ता शिरूर जि पुणे,गणेश दत्तात्रय मचाले रा इनामगाव ता शिरूर,जि.पुणे,राहुल लहू महारनोर रा.वांगदरी ता श्रीगोंदा यांच्यासह अनोळखी ७ते ८ ईसमांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न,कट रचून जबर मारहाण,आर्म ऍक्ट यासह विविध कलमाआंतर्गत आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करत आहेत

सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की शिवाजी चोरमले हे वरील तारीख व वेळेस त्यांच्या सात मित्रांसह काष्टी येथे हॉटेल लोकसेवा याठिकाणी जेवायला गेले होते ते जेवायला बसलेले असतानाच त्याठिकाणी वरील तिन्ही आरोपी आले त्यांनी चोरमले यांचे मित्र सचिन कुटे यांच्यासोबत आर्थिक व्यवहारवरून वाद घालत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यावेळी चोरमले व त्यांच्या मित्रांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु भांडण सोडवता याचा राग येऊन सूत्रधार शिंदे याने राहुल चोरमले यांना लाथाबुक्क्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर देखील चोरमले यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला त्यावर शिंदे व त्याच्या दोन साथीदारांनी आम्ही कोण आहेत हे तुम्हाला दाखवतो एकाला पण जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन तिघे आरोपी तिथून निघून गेले त्यानंतर काहीवेळातच सूत्रधार शिंदे यांच्यासह अनोळखी ७ते ८इसम हातात लाकडी दांडके, लोखंडी कोयता,चाकू, टिकावं घेऊन परत त्या हॉटेलमध्ये आले व त्यांनी शिवाजी चोरमले व त्यांच्या सहकाऱ्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी कोयता,टिकावाने मारहाण करण्यास सुरुवात केली यात कोयत्याने वार झाल्यामुळे चोरमले व त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले
आर्थिक व्यवहारातून सुरु झालेले भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडल्याच्या क्षुल्लक कारणातून एवढी जबर मारहाण व जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून पोलीस पुढील तपास करत आहेत

माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला,श्रीगोंदा तालुक्यातील घटना! माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला,श्रीगोंदा तालुक्यातील घटना! Reviewed by Prashasak on जून ०६, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.