प्रशासक न्यूज,दि.६जून
खऱ्या अर्थाने आता सर्वसामान्य जनता ही खासदार झाली आहे मी तर त्यांचा सेवक आहे काही लोकांना निवडून आल्यावर स्वतःला राजा आणि मतदारांना सामन्य प्रजा समजण्याची सवय असते मी तसा नाही मी एक सेवक आहे असं म्हणत नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी श्रीगोंदा तालुक्यातील मतदारांचे आभार मानले या दौऱ्यात त्यांच्यासोबत माजी आमदार राहूल जगताप हे होते जगताप यांच्या पिंपंळगाव येथील निवासस्थानी खा.लंके यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आले त्यानंतर शहरात आल्यावर घनश्याम शेलार,बाबासाहेब भोस या प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आभाराची एक छोटेखानी बैठक पार पडली
लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्याने निलेश लंके यांना जवळपास ३३ हजार मतांचे मताधिक्य देत त्यांचा विजय निश्चित केला त्यामुळे निकाल लागून दोन दिवस होत नाहीत तोच लंके आज सकाळीच श्रीगोंदा तालुक्याच्या आभार दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांचे पिंपंळगावपिसा,बेलवंडी,पारगाव फाटा,पारगाव, श्रीगोंदा शहर,लोणीव्यँकनाथ अश्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या उसाहात स्वागत केले निवडून येताच आपला नेता आपल्या भेटीला आल्यामुळे श्रीगोंदा शहरात तर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता खासदार निलेश लंके यांनी देखील स्वागतासाठी थांबलेल्या कार्यकर्ते मतदार यांना अभिवादन करत सत्कार स्वीकारला
श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज मंदिरात जाऊन त्यांनी शेरा चढवत दर्शन घेतले त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती त्याठिकाणी बोलताना लंके यांनी सर्व मतदार व कार्यकर्त्यांनी आपण स्वतः उमेदवार असल्या प्रमाणे ही निवडणूक हातात घेतली होती म्हणून आपण विजयी झालो असे सांगितले
*पाणी प्रश्न व बेरोजगारी यावर लक्ष केंद्रित करणार*
श्रीगोंदा तालुक्यात पाणीप्रश्न मुख्य असून येत्या काही दिवसात तो सोडवणार प्रत्येक तालुक्यात बेरोजगारी कमी करण्यासाठी एमआयडीसी उभी करणार तसेच शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यातबंदी व दुधाला बाजार भेटण्यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर प्रयत्न करणार असल्याचे लंके यांनी सांगितले
*अन्नछत्रालयाच्या कामाचे कौतुक,मदत जाहीर*
खासदार निलेश लंके यांनी संत शेख महंमद महाराज मंदिरातील अन्नछत्रालयाला भेट देऊन तिथल्या कामाची माहिती घेतली तरुणांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले दर गुरुवारी याठिकाणी मोठ्या स्वरूपात होत असलेल्या अन्नदानाच्या कामाचे कौतुक करत एक ट्रक तांदूळ आणि तेल डबे अशी भरीव मदत देण्याचे त्यांनी आश्वासन दिले
जनता हीच खासदार मी तर त्यांचा सेवक,नवनिर्वाचित खासदार लगेच मतदार, कार्यकर्त्यांच्या भेटीला
Reviewed by Prashasak
on
जून ०६, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
जून ०६, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: