धाकधूक वाढली,पैंजा लागल्या, आमदार विरुद्ध खासदार लढतीत कोण बाजी मारणार?



प्रशासक न्यूज,दि.३जून २०२४

लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे त्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातील लंके आणि विखेंच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे प्रत्येक कार्यकर्ता आपलाच नेता विजयी होणार असे आत्मविश्वासाने सांगत आहे तर काहीजण तज्ञ लोकांकडून उद्या नेमक काय होईल याचा अंदाज घेत आहेत तर काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आपलाच नेता विजयी होणार याबाबत लाखो रुपयांच्या पैंजा विरोधी नेत्याच्या कार्यकर्त्यांसोबत लावल्या आहेत
काही ठिकाणी आर्थिक तर काही ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या पैंजा लागल्या आहेत

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेत आ निलेश लंके विरुद्ध खासदार डॉ सुजय विखे अशी लढत झाल्यामुळे मतदानाच्या आधीपासूनच या निवडणुकीत रंगत आली होती विखेंच्या यंत्रनेणे तालुका पिंजून काढला तर लंकेच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केल निलेश लंकेना श्रीगोंदा तालुक्यातून सर्वाधिक लीड मिळेल अशी चर्चा तर दुसरीकडे विखे प्याटर्न यशस्वी होऊन तेच आघाडी घेतील असा आत्मविश्वास व्यक्त होत आहे असे असले तरी नेमकी विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे मात्र उद्या दुपारपर्यत समजणार आहे

आपलाच नेता विजयी होईल असे सांगणारे कार्यकर्ते तर आपण ज्याला मतदान केले तो निवडून येणार का या विचारात असणारे सुज्ञ मतदार सर्वांनाच उद्याच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे

लोकसभा निवडणुकीच मतदान पार पडल्यानंतर काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी निलेश लंके खासदार नावाचे फलक लावून त्यांचे अभिनंदन केले होते तर आता शिर्डीत डॉ सुजय विखेच निवडून येतील असे फ्लेक्स लागलेत त्यामुळे दोन्ही गटाकडून विजयाचा प्रबळ दावा केला जात आहे त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने कुणाच्या पारड्यात जास्त मते टाकलीत हे पाहणे औसूक्याचे ठरणार आहे

उद्या जो उमेदवार निवडून येईल त्याच्या विजयात श्रीगोंदा तालुक्याचा मोठा वाटा असणार आहे तालुक्यातून मिळणारे लीड हे विजयाची दिशा ठरवण्यात मोलाचा वाटा उचलणार आहे त्यामुळे आता कार्यकर्त्यांसह काही मतदारांनी सुद्धा मोठ्या पैंजा लावत आपलाच उमेदवार निवडून येणार असा दावा केला आहे

पारावर, हॉटेल मध्ये विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या उमेदवाराला किती लीड मिळणार तो कसा निवडून येणार यावर चांगलीच खलबत रंगत आहेत सर्वत्र उद्याच्या निकालाच्या चर्चा झडत आहेत निश्चितच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली असून श्रीगोंदा तालुका लंकेना लीड देणार की विखेना आघाडी मिळणार हे मात्र उद्याच समजणार आहे
धाकधूक वाढली,पैंजा लागल्या, आमदार विरुद्ध खासदार लढतीत कोण बाजी मारणार? धाकधूक वाढली,पैंजा लागल्या, आमदार विरुद्ध खासदार लढतीत कोण बाजी मारणार? Reviewed by Prashasak on जून ०३, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.