प्रशासक न्यूज,दि.२०मे २०२४
आग ओकणारा सूर्य प्रचंड उष्णता त्यामुळे असह्य झालेला उकाडा या सर्व गोष्टीमुळे नागरिक आधीच हैराण झाले आहेत या उकड्यापासून वाचण्यासाठी लोक घरात फॅन,कुलर एसी याचा आधार घेत आहेत पण मागील काही दिवसांपासून श्रीगोंदा शहरात सूरु झालेल्या विजेच्या लपंडावामुळे व्यवसायीकांसह नागरिक मात्र प्रचंड वैतागले आहेत
दिवसातून पाच ते सहा तास वीज गायब राहत असून संध्याकाळी वीज आल्यावरसुद्धा सारखी येजा करत आहे या सर्व प्रकाराबाबत नागरिकांनी वीज मंडळाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कुठलंच समाधानकारक उत्तर दिल जात नाही वीज जाण्याचे येण्याचे कुठलेही टाईम टेबल नाही त्यामुळे व्यवसायिकांचे नुकसान होत आहे बाहेर सूर्य आग ओकत असताना घरात वीज नसल्यामुळे घरात बसणं लोकांना मुश्किल झालं आहे एवढी सगळी परिस्थिती बिकट असताना वीज मंडळाकडून मात्र कामकाजत कुठली सुधारणा होताना दिसत नाही
*लोकप्रतिनिधीसह,राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष*
विजेच्या समस्येने नागरिक त्रस्त झालेले असतानाच या प्रश्नावर मात्र लक्ष घालण्यासाठी कुठलाच राजकीय नेता पुढे सरसावलेला दिसत नाही तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते हे तब्बेत ठीक नसल्यामुळे सक्रिय नाहीत त्यामुळे आता तालुक्याला कुणी वाली राहिला आहे की नाही सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर कोण आवाज उठवणार असा प्रश्न लोकांना पडला आहे
*महिन्याचे फिक्स चार्ज कमी करा*
मागील अनेक दिवसांपासून शहरात हा विजेचा खेळखंडोबा सुरु आहे दिवसातून अनेक तास वीज गायब असून सुद्धा विजमंडळाकडून भरमसाठ वीज बिलाची आकारणी केली जात आहे त्यामुळे नागरिकां मधून नाराजी व्यक्त होत असून विजेच्या मिटरचे महिन्याचे फिक्स चार्ज कमी करण्याची मागणी आता जोर धरत आहे
*व्यवसायिक संतापले*
उन्हाळ्याच्या दिवसात शितपेये विक्री करणारे आयस्क्रीम विक्रेते अश्या,पाणी विक्रेते अश्या वेगवेगळ्या व्यवसायीकांचा धंदा हा विजेवर अवलंबून आहे सतत जाणाऱ्या विजेमुळे मालाची नासाडी होऊन या व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे
*सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन*
श्रीगोंदा शहरात सतत खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याच्या प्रश्नाबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून सुद्धा विजमंडळाच्या कामकाजात सुधारणा होत नसल्यामुळे आज श्रीगोंदा वीज मंडळाच्या गलथान कारभारा विरोधात शहरातील सामाजिक कार्यकर्ते सतीश बोरुडे,टिळक भोस यांच्यासह विशाल सकट,काकासाहेब कदम,संदीप कुनगर,गणेश काळे,युवराज पळसकर,हुसेन खान,अल्ताफ शेख,वाल्मिक गायकवाड,सोमा गोडसे या जागरूक तरुणांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन केले
*वीजमंडळाकडून लेखी आश्वासन आणि आंदोलन तात्पुरते स्थगित*
श्रीगोंदा शहरातील उच्चदाब,लघुदाब वाहिनी दुरुती,रोहित्र दुरुस्ती आणि एबी स्विच बसवण्यासाठी एजन्सी नेमण्यात आली असून प्रत्येक शनिवारी दुरुस्तीची कामे केली जातील दि १८ मे पासून दुरुतीच्या कामाना सुरुवात झाली आहे येत्या ३१ मे पर्यत शहरातील सर्व दुरुस्तीची कामे पूर्ण होतील असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना वीज मंडळाकडून उपकार्यकारी अभियंता सूर्यवंशी व कनिष्ठ अभियंता कावरे यांनी दिले त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले
*....अन्यथा अधीक्षक अभियंत्यांच्या दालनातच ठिय्या*/-सामाजिक कार्यकर्ते सतीश बोरुडे
आज वीजमंडळाने ३१ मे पर्यत शहरातील विजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे जर तोपर्यत विजपुरवठा सुरळीत झाला नाही तर मग मात्र आम्ही वीज मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार आहोत
आधीच उकाड्याने हैराण,त्यात विजेच्या लपंडावाने नागरिक परेशान!
Reviewed by Prashasak
on
मे २०, २०२४
Rating:
Reviewed by Prashasak
on
मे २०, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: