सलग दुसऱ्या दिवशी विचित्र दुर्घटनेत अजून एक मृत्यू,तालुका हळहळला


प्रशासक न्यूज,दि.१९मे २०२४

विजेचा शॉक लागून काष्टी येथील एका चाळीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी घडली होती ही घटना घडून २४ तास उलटत नाहीत तोच आज काष्टी गावच्या शेजारच्या लोणीव्यँकनाथ गावात एका विचित्र दुर्घटनेत सुनील पांडुरंग पाटील वय ४५ रा मडकेवाडी यांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे पाटील हे खरेदी विक्री संघाच्या काही दिवसापूर्वीच झालेल्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आले होते

सदर घटनेबाबत स्व पाटील यांचे मामा शंकर मारुती देवखिळे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे

सदर घटनेबाबात माहिती अशी की,आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुनील पाटील हे ट्रॅक्टर घेऊन शेताकडे जात असताना लोणी व्यंकनाथ गावच्या शिवारात वांगदरी फाटा येथे ट्रॅक्टर कॅनोल मध्ये पडला त्यात पाटील हे ट्रॅक्टर खाली अडकले या विचित्र अपघातात त्यांच्या छातीला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर त्यांना उपचारासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले

पाटील हे आज सकाळीच गावात अनेकांना भेटले होते त्यानंतर काही वेळातच त्यांच्या निधनाची बातमी आल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे सदर घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अपघातात असा अजून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे
सलग दुसऱ्या दिवशी विचित्र दुर्घटनेत अजून एक मृत्यू,तालुका हळहळला सलग दुसऱ्या दिवशी विचित्र दुर्घटनेत अजून एक मृत्यू,तालुका हळहळला Reviewed by Prashasak on मे १९, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.