प्रशासक न्यूज,दि.१४मे २०२४
श्रीगोंदा तालुक्यात काल लोकसभेसाठी एकूण ६७.८९%मतदान झाले अनेक भागातील मटपेट्या श्रीगोंद्यात येण्यास रात्री उशीर झाला त्यामुळे मतदानाची आकडेवारी जुळवण्याचे काम रात्री उशिरा पर्यत सुरु होते आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यात एकूण ३,२८,९५६मतदार असून त्यात एकूण पुरुष मतदार १,७२,०३६ तर एकूण महिला मतदार १,५६,९१७ एवढ्या आहेत त्यापैकी काल झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदाव नगर तालुक्यातील एकूण २,२३,३४०मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये १,२४,४३०पुरुष मतदार तर ९८,९१०महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
श्रीगोंदा शहरात मतदान केंद्रानुसार झालेल्या मतदानाची टक्केवारी
बूथ क्रं---झालेले मतदान टक्केवारीत
२४०---७३.३६
२४१---७२.०१
२४२---६६.३०
२४३---६३.०३
२४४---७१.६१
२४५---६५.६६
२४६----५५.८८
२४७---६२
२४८---७७.१३
२४९---६५.४०
२५०---६६.९३
२५१---७५.८९
२५२---६१.९४
२५३----६९.९७
२५४----५८.२६
२५५----६७.४५
२५६----५६.९७
२५७---५८.७६
२५८---६६.८२
२५९---६८.४३
२६०---६६.३८
२६१---६२.१९
२६२---६०.४७
२६३---५३.१०
२६४---६०.७१श्रीगोंदा तालुक्यात काल लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले तालुक्यातील एकूण ३४५ बूथवर हे मतदान पार पडले काल सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली सकाळी मतदार मतदान केंद्रावर गर्दी करतील असे वाटतं असतानाच आज मात्र सकाळच्या वेळेस मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले तर दुपारच्या वेळेस शहरातील अनेक मतदान केंद्रावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाली असे असले तरी मतदानची टक्केवारी मात्र खूप कमी झाली आहे संध्याकाळी मतदानाची वेळ संपत आल्यावर अनेक मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले
पैसे वाटपाच्या काही तक्रारी वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले आजच्या मतदान प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता बाहेरच्या जिल्ह्यातून मोठा बंदोबस्त आजच्या निवडणुकीसाठी तालुक्यात मागवण्यात आला होता तालुक्यातील मांडवगण,आढळगाव,बेलवंडी,मढेवडगाव अश्या संवेदनशील मतदान केंद्रावर सुद्धा शांततेत मतदान पार पडले तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या काष्टी गावात तर माजी आमदार राहुल जगताप,नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासह तालुक्यातील नेत्यांनी आपापल्या गावी मतदान केले
आज सकाळपासूनच दोन्ही बाजूच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी आप आपल्या भागातील बूथवर थांबून आपल्या नेत्यासाठी जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न केला
बाजार सुरु असल्याची तक्रार
आज श्रीगोंद्याचा आठवडे बाजार सुरु होता याबाबत प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर श्रीगोंदा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी बाजारात जाऊन बाजार बंद करण्यासा सांगितलं पण शेतकरी भाजी विक्रेते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन बाजारकरुणा समजावण्याचा प्रयत्न केला काहीकाळ बाजार बंद झाल्यानंतर नगरपरिषदेने याबाबत पूर्वकल्पना न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत पुन्हा बाजार सुरु केला
श्रीगोंदा तालुक्यात ६७.८९%मतदान
Reviewed by Prashasak
on
मे १४, २०२४
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: