अहिल्यानगर च्या सुरक्षेसाठी मला खासदार करा/-डॉ विखे


प्रशासक न्यूज,दि.११मे

अहिल्यानगर ला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पारनेरच्या गुंडाची गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पुन्हा मला खासदार करा असे आवाहन आज श्रीगोंद्यात शेख महंमद महाराज मंदिर प्रांगणात झालेल्या सांगता सभेत महायुतीचे लोकसभाचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ सुजय विखे यांनी केले तसेच मला पारनेर मधूनच सर्वात जास्त लीड मिळणार असल्याचे त्यांनी मोठ्या विश्वासाने यावेळी सांगितले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ विखे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेचे आज श्रीगोंद्यात आयोजन करण्यात आलेले होते सभेची सर्व तयारी झालेली असतानाच सभेला सुरुवात होताच दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे नितीन गडकरी यांना सभास्थळी येता आले नाही त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात भर पाऊसातच ही धावती सभा संपन्न झाली

अचानक आलेल्या अवकाळी पाऊसाने कार्यकर्त्यांसह पत्रकार,बंदोबस्तासाठी आलेले पोलीस यांची चांगलीच धावपळ उडाली कार्यकर्त्यांनी पाऊस सुरु झाल्यावर डोक्यावर खुर्च्या घेत सभा ऐकली परंतु त्यानंतरही पाऊस सुरु राहिल्यामुळे लोकांनी आजूबाजूला मिळेल त्या गोष्टीचा आसरा घेतला त्यामुळे नंतर आयोजकांना सभा आटोपती घ्यावी लागली

पाऊसाला सुरुवात होताच सुजय विखे यांनी माईकचा ताबा घेत आपल्या भाषणाला सुरुवात केली बोलताना त्यांनी निलेश लंके यांच्यावर सडकून टीका केली यावेळी विखे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले

पाऊसाला सुरुवात होण्याआधी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजप युवा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी डॉ सुजय विखे यांच्या पाठीशी श्रीगोंदा तालुक्यातील जनता उभी राहणार आहे यात कुठलीही गडबड होणार नाही असे सांगितले
*कुकडीने टाळले पण पाऊसाने तारले आणि अनेकांच्या भूवया उंचावल्या*
विक्रम पाचपुते बोलत असताना पाऊसाला सुरुवात झाली त्याचा धागा पकडत पाऊस येणे हा शुभसंकेत असून श्रीगोंद्याला पाणी मिळाले नाही पण पाऊस आला असं वक्तव्य केले विक्रमसिंह यांच्या या वक्तव्यामुळे काहींनी भुवया उंचावल्या

*पारनेरची गुंडगीरी मोडीत काढा,साडेचार वर्षे आमदाराने छळ केला/-डॉ सुजय विखे*
यानंतर बोलताना डॉ सुजय विखे यांनी आक्रमक शैलीत निलेश लंके यांचे नाव न घेता पारनेर च्या गुंडाची दडपशाही मोडीत काढायची पारनेरला फोन लावून विचारा प्रशासनाला हाताशी धरून तिथल्या आमदाराने जनतेचा किती छळ केला सभेचा हा आवाज पारनेर पर्यत पोहोचू दया कॅनेल ब्लास्ट करायची भाषा हा आमदार करतो कॅनेल ब्लास्ट केल्यावर कुकडीच पाणी कस येणार पोलीस अधिकारी,प्रशासन यांना अरेरावीची भाषा समोरचा उमेदवार वापरत आहे त्याच्या उलट विखे घराण्याने पन्नास वर्ष सुसंकृत राजकारण नगर जिल्ह्यात केले असे विखे यांनी सांगत आपल्या भाषणात फक्त निलेश लंके यांच्यावरच टिकेची तोफ डागली

*विखेना निवडून दया रस्त्याच काम करून घ्या/-हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील यांनी मुसळधार पाऊस सुरु असताना छोटेखानी भाषण केले त्यात त्यांनी डॉ विखे यांना निवडून दया आणि तुमच्या भागातील कोणताही रस्त्याचे काम सांगा ते मी करून देईल असा निरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माझ्याजवळ दिला असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात सांगून सुजय विखेना विजयी करा असे सांगितले

आजच्या सभेचे अध्यक्षस्थान आमदार बबनराव पाचपुते यांनी भूषवले प्रकृती ठीक नसतानाही आमदार पाचपुते आवर्जून या सभेसाठी उपस्थित होते

या सभेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा,दत्तात्रय पानसरे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुभाष शिंदे,शरद नवले,भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे,प्रतिभा पाचपुते,बाळासाहेब महाडिक,सुनील तात्या दरेकर,मिलिंद दरेकर यांच्यासह शिवसेना(शिंदेगट)महिला जिल्हाध्यक्ष मीरा शिंदे,तालुकाध्यक्ष नंदकुमार ताडे,बाबुशेठ टायरवाले,मनसे तालुकाध्यक्ष अतुल कोठारे यांच्यासह महायुतीचे नगरसेवक,पदाधिकारी उपस्थित होते

अहिल्यानगर च्या सुरक्षेसाठी मला खासदार करा/-डॉ विखे अहिल्यानगर च्या सुरक्षेसाठी मला खासदार करा/-डॉ विखे Reviewed by Prashasak on मे ११, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.