हा तर माझा बहुमान,अन्यथा शेतकऱ्यांसाठी कालवा फोडेल/लंकेंची प्रचारसभा -


प्रशासक न्यूज,दि.८मे २०२४

आधीच्या काळात देशात लोकसभा निवडणुका दोन दिवसात व्हायच्या तामिळनाडू,गुजरात मध्ये एका दिवसात सर्व जागांसाठी निवडणूक पार पडली उत्तरप्रदेश मध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे परंतु मोदींना महाराष्ट्रात जिंकण्याची खात्री नसल्यामुळे आणि त्यांना सारखं महाराष्ट्रात येता यावं यासाठी निवडणुकीच वेळापत्रक बदलून महाराष्ट्रातच निवडणुकीचे चार ते पाच टप्पे करण्यात आले तसेच देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात आले कि फक्त माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंनवर बोलतात मोदींना माझ्याशिवाय समोर दुसरं कुणीच दिसत नसून माझ्यावर मोदींकडून सतत होणारी टीका हा माझ्यासाठी बहुमान असल्याचे शरद पवार यांनी सांगत मोदींकडून सातत्याने होणाऱ्या टिकेचा त्यांनी शालजोडीतून समाचार घेतला

महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा शहरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत आज माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरद पवार गट)अध्यक्ष शरद पवार बोलत होते

यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत पुढे लोकसभा विधानसभा निवडणुका देखील होणार नाहीत हे लोकशाहीला घातक आहे भारताच्या लोकशाहीची जगाला चिंता आहे कांदा,साखर निर्यातबंदी वरून त्यांनी केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला

*५०वर्षे नाही तर ५६वर्ष्यापासून हा आत्मा महाराष्ट्रात फिरतोय*

मागील पन्नास वर्ष्यापासून एक अतृप्त आत्मा महाराष्ट्रात फिरत असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली होती त्याचा खरपूस शब्दात समाचार घेत पवार यांनी ५० नाही तर ५६ वर्षांपासून हा आत्मा सामान्यांच्या प्रश्नासाठी फिरत असून तीच सामान्य जनतेसोबत माझी असलेली नाळ तोडण्यासाठी मोदी महाराष्ट्रात फिरत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले
आज झालेल्या या सभेसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड,शिवसेनेचे खासदार संजय राऊत,आ रोहित पवार,माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक निलेश कराळे,माजी आमदार राहुल जगताप,सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,घनश्याम शेलार,बाबासाहेब भोस काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर,शिवसेना(ठाकरे गट)तालुकाध्यक्ष बाळासाहेब दुतारे यांच्यासह काँग्रेस,शिवसेना(ठाकरे गट)पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिदास शिर्के यांनी केले

*या नेत्यांचा प्रवेश*

मागील काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटात प्रवेश केलेले नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ व त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्या अनुराधा ठवाळ यांनी देखील राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलताना मतदान होईपर्यत काळजी घ्या असे सांगत रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन केल कारण तो गुजरातचा आहे म्हणून असे सांगत भाजपने आता खेळात पण राजकारण करण्यास सुरुवात केल्याची टीका थोरात यांनी केली

शिवसेना नेते संजय राऊत यांनी निलेश लंके यांच्या भाषणाचा धागा पकडत लंके हे खरे शिवसैनिक आहेत त्यामुळेच ते फोडण्याची,कॅनेल उडवून देण्याची भाषा बोलतात शिवसैनिक अजूनही त्यांच्या रक्तात आहे असे सांगून खासदाराला इंग्रजी येण्यापेक्षा लोकांचे प्रश्न संसदेत मांडता आले पाहिजेत सुजय विखेनी पाच वर्ष्यात एक ही प्रश्न लोकसभेत मांडलेला नाही त्याचा त्यांना काही फरक पडत नाही ते ऐशो आरामात जीवन जगतात असे सांगून खोटं बोलण्याच्या स्पर्धेत मोदींचा जगात पहिला नंबर येईल असे सांगून मोदी हे प्रधानमंत्री नसून ते प्रचारमंत्री असल्याची टीका संजय राऊत यांनी केली


सोशल मीडियावर फेमस असणारे महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक निलेश कराळे सर म्हणाले भाजप वाले राफेल विमानाला लिंबू मिरची बांधतात यातून ते तरुणांना काय शिकवणार दाढीवाल्याने देशाचा सत्यानाश केला तसेच मोदी हे देशाचे नव्हे गुजरातचे प्रधानमंत्री असल्याची टीका करत नमोल्लेख न करता पनवती असे म्हणत अमित शहांचा त्यांनी समाचार घेतला

जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजपने कालच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवली जेवढे ठरवले तेवढे पैसे पण लोकांना दिले नाहीत साकळाई प्रश्नाबाबत सुजय विखेनी लोकांची फसवणूक केली अशी टीका करत तलाठी भरतीवर बोललो तर माझ्यावर कारवाईची भाषा विखे करतात मी कोणत्याच कारवाईला घाबरत नाही विखेची जिल्ह्यातील मक्तेदारी मोडीत काढणार असे रोहित पवार यावेळी म्हणाले

*तर पाण्यासाठी कालव्यात झोपेल,अन्यथा ब्लास्ट करेल*

आज सभेत बोलताना निलेश लंके यांनी कुकडीचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही तर मी कॅनेल मध्ये झोपेल किंवा वाट्टेल तो संघर्ष करेल पण शेतकऱ्यांना पाणी मिळवून देईन पुणे भागातील काही लोकांनी पाणी प्रश्नात अडथळा निर्माण केल्यास कुकडीचे पाणी सर्व शेतकऱ्यांना नाही मिळाले तर माझ्या भागातूनच कॅनेल जातो मी ब्लास्ट करून कॅनेल फोडील असे लंके म्हणाले यावेळी विखे कुटुंबीय खोटारडे असल्याचा आरोप करत साकळाई योजनेबाबत विखेनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओच त्यांनी सभेत ऐकवला

*कार्यकर्त्यांचा आग्रह आणि घोषणाबाजी आणि राहुल जगतापांना बोलण्याची संधी*

आजच्या सभेसाठी मोठे नेते बोलणार असल्यामुळे वेळेअभावी स्थानिक नेत्यांना बोलण्यापासून दूर ठेवण्यात आले परंतु माजी आमदार राहुल जगताप यांना बोलू दया अशी आग्रही मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली त्यावर जगताप यांनी बोलताना महाविकास आघाडी चे आम्ही सर्व नेते एक आहोत विधानसभेला कुणाला तिकीट दया आमच्यात भांडण नाही पण जे इच्छुक तिकडे गेलेत त्यांचे आणि आताचे आमदार बबनराव पाचपुते हे कोण कुणाचा प्रचार करत तिकीट कुणाला मिळत,कोण कुणाला सूचक अनुमोदक राहत हे आम्हाला पाहायचंय असं म्हणत त्यांनी नाव न घेता नागवडे यांच्यावर टीका केली
हा तर माझा बहुमान,अन्यथा शेतकऱ्यांसाठी कालवा फोडेल/लंकेंची प्रचारसभा - हा तर माझा बहुमान,अन्यथा शेतकऱ्यांसाठी कालवा फोडेल/लंकेंची प्रचारसभा - Reviewed by Prashasak on मे ०८, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.