पत्रकार चंदन घोडके या पुरस्काराने सन्मानित


प्रशासक न्यूज,दि.५मे

फुले,शाहू,आंबेडकर विचारमंच व संयुक्त जयंती महोत्सव संघमित्र तरुण मंडळ यांच्यावतीने शनिवारी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा भीमरत्न समाजरत्न पुरस्कार देऊन
गौरव करण्यात आला.

श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर याठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील बहुजन समता पत्र पोर्टल व मासिकाचे संपादक पत्रकार चंदन घोडके यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामागिरी केल्याबद्दल भीमरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

आतापर्यंत पत्रकार चंदन घोडके यांनी वंचित घटकातील दिनदलित,मागासवर्गीय,आदिवासी व अशा अनेक वंचित समाजावरील होणाऱ्या अत्याचार अन्याय यांच्याविरुद्ध आवाज उठवून लेखणीच्या माध्यमांतून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे याच कार्याची दखल घेऊन पत्रकार चंदन घोडके यांना भिमरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पुरस्कार मिळाबद्दल चंदन घोडके यांचा सर्व स्तरातून अभिनंद केले जात आहे.

आपल्या कामाची दखल घेतल्याचा आनंद झाला असून इथून पुढच्या काळातही अन्यायाविरुद्ध व समाजातील विविध गोरगरीब घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून मी प्रयत्न करत राहणार अशी प्रतिक्रिया पुरस्कार मिळाल्यानंतर पत्रकार चंदन दीपक घोडके यांनी दिली
पत्रकार चंदन घोडके या पुरस्काराने सन्मानित पत्रकार चंदन घोडके या पुरस्काराने सन्मानित Reviewed by Prashasak on मे ०५, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.