विखेंनी कोरोना काळात पाणी भरलेले रेमडीसीवर आणले/-निलेश लंके यांचा गंभीर आरोप


प्रशासक न्यूज,दि.२६एप्रिल 

कोरोना काळात सुजय विखे यांनी विमानाने जे रेमडीसीवर इंजक्शन आणले होते त्यात पाणी भरलेले होते असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केला असून असा सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल असल्याचे देखील त्यांनी सांगितले लंके आज श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी दिवसभरात शिवसेना ठाकरे गट तसेच विविध असोशीयेशन चे पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला त्यानंतर संध्याकाळी माजी आमदार राहुल जगताप यांच्या श्रीगोंदा शहरातील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लंके यांनी विखेवर ही टीका केली

या पत्रकार परिषदेसाठी बाबासाहेब भोस,घनश्याम शेलार,माजी आमदार राहुल जगताप यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

तसंच कोरोना काळात सर्वात आधी लसीकरण हे विळदघाटात सुरु झाले तिथेसुद्धा लसीकरणाच्या नावाखाली करोडो रुपयांची विखेनी बोगस बिले काढल्याचा घणाघाती आरोप लंकेनी केला
मी निवडणूक आल्यावर तयारी करणारा नाही मी सामान्य लोकांसाठी कायम तयार असतो जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून १९दिवसात ३५०गावांमध्ये मी पोहोचलो त्या माध्यमातून मतदार संघाची भौगोलिक परिस्थिती मतदारसंघातले प्रश्न समजून घेतले ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली असून आपला विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केला

*चार सहा डफड्यावाले हाताशी धरून मताधिक्य कस मिळवणार*
विखेनी आपल्याला पारनेर मधूनच लीड मिळेल असे सांगितले याबाबत लंकेना विचारले असता चार सहा डफड्यावाले हाताशी धरून तुम्ही कस लीड मिळवणार मी माझ्या मतदारसंघासाठी दिवस रात्र एक केला आहे विखेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते असे वायफळ व्यक्तव्य करत असल्याचे लंकेनी मिश्किलपणे सांगितले
तसेच एमआयएम चा एक आणि माझ्याच नावाचा डमी उमेदवार भाजपने उभा केलाय त्यांनी माझा धसका घेतल्यामुळेच ते आता डमी उमेदवार उभे करत असल्याचे लंकेनी सांगितले

श्रीगोंदा,कर्जत,पारनेर तालुक्यातील सर्व शेतकरी माझे आहेत त्यामुळे भविष्यात कुकडीच्या पाणी प्रश्नाबाबत मी ठाम भूमिका घेईल वेळ पडली तर टोकाचा संघर्ष करण्याची तयारी लंकेंनी बोलून दाखवली 

अजीत पवार यांच्याकडून पारनेर मध्ये एवढा निधी घेतला आणि त्यानंतर तुमचं आणि अजित पवार यांचं नेमक काय बिनसल असे पत्रकारांनी विचारले असता अजित पवार यांच्यासारखा नेता राज्यात टिकला पाहिजे म्हणून त्यांच्यासोबत होतो आणि अजित दादा आणि मी कुटुंबातील आहोत ते माझे नेते आहेत असे म्हणत त्यांनी गुगली टाकली पण या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले
विखेंनी कोरोना काळात पाणी भरलेले रेमडीसीवर आणले/-निलेश लंके यांचा गंभीर आरोप विखेंनी कोरोना काळात पाणी भरलेले  रेमडीसीवर आणले/-निलेश लंके यांचा गंभीर आरोप Reviewed by Prashasak on एप्रिल २६, २०२४ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.